​मल्याळम अभिनेत्री मिथिली ठरली ब्लॅकमेलिंगची शिकार! वाचा काय आहे प्रकरण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2017 09:47 AM2017-07-24T09:47:03+5:302017-07-24T15:17:03+5:30

साऊथची लोकप्रीय अभिनेत्री मिथिली हिचे खासगी फोटो इंटरनेटवर लीक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, मिथिलीचे खासगी ...

Malayalam actress Mithili became the victim of Blackmail! Read what the episode !! | ​मल्याळम अभिनेत्री मिथिली ठरली ब्लॅकमेलिंगची शिकार! वाचा काय आहे प्रकरण!!

​मल्याळम अभिनेत्री मिथिली ठरली ब्लॅकमेलिंगची शिकार! वाचा काय आहे प्रकरण!!

googlenewsNext
ऊथची लोकप्रीय अभिनेत्री मिथिली हिचे खासगी फोटो इंटरनेटवर लीक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, मिथिलीचे खासगी फोटो सोशल मीडियावर टाकणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून, तिचा एक्स बॉयफ्रेन्ड किरण कुमार आहे. याप्रकरणी पोलिसांनी किरण कुमारला अटक केली आहे.

मिथिली आणि किरणकुमार हे दोघे २००८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. किरणकुमार विवाहित होता. पण त्याने ही बाब मिथीलीपासून दडवून ठेवली. अखेर त्याचे बिंग फुटले आणि मिथिलीने त्याच्यासोबतचे सगळे संबंध संपुष्टात आणलेत. पण यानंतर किरण कुमारने मिथिलीला ब्लॅकमेल करणे सुरु केले. मिथिलीच्या सेटवर जाऊन, घरी जाऊन गोंधळ घालण्याचे प्रकारत्याने केले. शिवाय ७५ लाख रुपए देण्याची, अन्यथा मिथिलीचे अतिशय खासगी फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकीही त्याने दिली. गेल्या काही महिन्यांपासून किरण कुमार मिथिलीला अशाप्रकारचा त्रास देत होता. या प्रकाराला त्रासून मिथिलीने थेट पोलिसांत धाव घेऊन किरणकुमार विरोधात तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी ही तक्रार फार गंभीरपणे घेतली नाही. इकडे मिथिली आपल्या धमक्यांना दाद देत नाही हे पाहून चवताळलेल्या किरणकुमारने अखेर तिचे फोटो अपलोड करण्याचे ठरवले आणि त्याने हे केले देखील.  किरणकुमारसोबतचे मिथिलीचे फोटो व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवरून वेगाने व्हायरल झालेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुन्हा मिथिलीने या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर कुठे पोलिसांना जाग आली.  पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मिथिलीचे फोटो व्हायरल करण्यामध्ये आणखी काही लोकांचा हात असल्याचे समोर आले आहे. या लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे एनार्कुलमचे सहाय्यक पोलिस आयुक्त के. लालजी यांनी सांगितले.

Web Title: Malayalam actress Mithili became the victim of Blackmail! Read what the episode !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.