मल्याळम स्टार दिलीप व काव्याचे ‘सरप्राईज वेडिंग’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 12:56 PM2016-11-25T12:56:39+5:302016-11-25T13:00:41+5:30
मल्याळम स्टार दिलीप आणि काव्या माधवन आज शुक्रवारी लग्नबंधनात अडकले. कोच्चीमध्ये जवळचे कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा ...
म ्याळम स्टार दिलीप आणि काव्या माधवन आज शुक्रवारी लग्नबंधनात अडकले. कोच्चीमध्ये जवळचे कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. हादिलीप आणि काव्याच्या विवाह सोहळा म्हणजे, सगळ्यांसाठीच सरप्राईज होते. कारण चाहत्यांना आणि निमंत्रितांना पूजेचे आमंत्रण दिले गेले होते. निमंत्रित पोहोचले तेव्हा त्यांना लग्न सोहळा असल्याचे कळले. हे सरप्राईज यासाठी कारण दिलीप व काव्या दोघांनाही यावेळी मीडियाची उपस्थिती नको होती.
सकाळी ९ ते १० या वेळेत हा सोहळा पार पडला. यावेळी २०० निमंत्रित उपस्थित होते. यात मॉलिवूड स्टार्स, मेनका, चिप्पी हे ज्येष्ठ कलाकार अशा सगळ्यांचा समावेश होता. दिलीपने फेसबुकच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी लग्नाची बातमी शेअर केली. आज माझ्या आयुष्यातील सगळ्यांत मोठा इव्हेंट आहे. मी आज लग्न करतोय. याप्रसंगी जगभरातील लोकांचे आशीर्वाद मला मिळतील, अशी मी आशा करतो. जिच्यासोबत माझे नाव जोडले गेले, तिच्याशीच मी लग्न करतोय. पण कृपया या लग्नाची सुरुवात कुठल्याही वादाने होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. त्याऐवजी आम्हाला आशीर्वाद द्या,असे दिलीपने फेसबुकवर लिहिले.
दिलीप व काव्याने सर्व अतिथींना नमस्कार केला आणि यानंतर काव्याने दिलीपला वरमाला घातली. यानंतर दिलीपने काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. या विधीनंतर नवदांम्पत्यान सर्वप्रथम दिग्दर्शक कमल यांचे आशीर्वाद घेतले. कमल यांनीच काव्या व दिलीप यांची भेट घालून दिली होती. दिलीप व काव्या या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी दिलीप अभिनेत्री मंजू वारिअर हिच्यासोबत अशाच सरप्राईजिंग पद्धतीने लग्नबंधनात अडकला होता. अलीकडे या दोघांचा घटस्फोट झाला. काव्यानेही पहिल्या पतीशी घटस्फोट घेत हा दुसरा संसार थाटला.