हिरोईन बनण्यासाठी आईवडिलांशीच तोडलं नातं, इंटिमेट सीन्सने घातला धुमाकूळ; कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 11:51 AM2023-08-10T11:51:35+5:302023-08-10T11:52:25+5:30
ज्या दिवशी तिने घरातून बाहेर पाऊल टाकले तिने आईबाबांशी कायमचे संबंध तोडले.
मनोरंजनसृष्टीत येण्यासाठी आऊटसायडर्सना मोठा स्ट्रगल करावा लागतो हे आता सर्वश्रुत आहे. अभिनयाचा वारसा असलेल्यांना लवकर संधी मिळते मात्र बाहेरच्यांना खूप वाट पाहावी लागते. अनेकदा कितीतरी गोष्टींचा त्यागही करावा लागतो. अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने अभिनय क्षेत्रात येण्यासाठी आपल्या आईबाबांशीच नातं तोडलं होतं. ज्या दिवशी तिने घरातून बाहेर पाऊल टाकले तिने आईबाबांशी कायमचे संबंध तोडले. यानंतर फिल्मइंडस्ट्रीत आल्यावर तिच्या इंटिमेट सीन्सने धुमाकूळ घातला. कोण आहे ती अभिनेत्री?
आम्ही बोलतोय 'मर्डर'सिनेमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री मल्लिका शेरावतबद्दल (Mallika Sherawat). होय मल्लिका शेरावतने अभिनयात येण्यासाठी कुटुंबाशी संबंध तोडले होते. मल्लिका मूळची हरियाणाच्या जाट समुदायातली आहे. तिच्या कुटुंबात कोणाही मुलीला अभिनेत्री होण्याचं स्वप्न बघण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. मात्र मल्लिकाने न केवळ ते स्वप्न पाहिलं उलट पूर्णही केलं. मात्र या सगळ्यात ती कुटुंबापासूनच दुरावली. मल्लिकाचं खरं नाव रीमा लांबा असं आहे. हरियाणाच्या एका छोट्या गावात तिचा जन्म झाला. मुकेश कुमार लांबा असं तिच्या वडिलांचं नाव आहे तर संतोष शेरावत आईचं. मल्लिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की वडिलांनी नाही तर आईने कायम पाठिंबा दिला म्हणूनच मी आईचं आडनाव लावते.
मल्लिका म्हणाली,'मी जेव्हा अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत आले तेव्हा माझ्या कुटुंबाला गमावून बसले. मी त्यांचा पाठिंबा, प्रेम सगळंच गमावलं. वास्तवमध्ये माझं खूप नुकसान झालं. मोठे होत असताना आपण खूप भोळे असतो कारण आपण कधी जगाचा सामना केलेलाच नसतो. मला वाटलं मी जग जिंकू शकते.'
मल्लिका शेरावत अमिताभ बच्चन ते शाहरुख खान, इम्रान हाश्मी यांच्यासोबत काम केले आहे. म्युझिक व्हिडिओ केले आहेत. 'जीना सिर्फ मेरे लिए' या तुषार कपूर आणि करिना कपूर यांच्या सिनेमात ती पहिल्यांदा दिसली. 2003 मध्ये आलेल्या फिल्म 'ख्वाहिश' ने तिला ओळख मिळवून दिली. तर 'मर्डर' सिनेमाने तिला स्टार बनवले. तिच्या इंटिमेट सीन्सने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला होता. मल्लिकाने हॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले आहे. शिवाय तिने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही हजेरी लावली आहे.