मल्लिका शेरावत केरळमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 06:49 PM2020-12-30T18:49:43+5:302020-12-30T18:50:15+5:30

अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या केरळमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.

Mallika Sherawat is enjoying vacation in Kerala, photos came in front | मल्लिका शेरावत केरळमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, फोटो आले समोर

मल्लिका शेरावत केरळमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, फोटो आले समोर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या केरळमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. तिने सोशल मीडियावर व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मल्लिकाने निळ्या रंगाच्या मॅक्सी गाऊनमध्ये दिसली आहे. या ड्रेसमध्ये तिने कॅन्डीड पोझही दिली. ती खूप ग्लॅमरस दिसते आहे. 

मल्लिका शेरावत हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले, आनंदी वाटते आहे. याशिवाय तिने यलो कलर वन साइड शोल्डर ड्रेसमध्येही फोटो शेअर केले आहेत. या अगोदर मल्लिकाने बरेच फोटो शेअर केले होते. काहींमध्ये ती बिकिनीमध्ये दिसली होती. मल्लिका तिच्या सुट्टीचा पूर्ण आनंद घेत आहे.


दरम्यान, मल्लिका शेरावत बर्‍याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे, दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिने डिजिटल डेब्यू केला होता.

ती एकता कपूरची वेब सीरिज बू सबकी फाटेगीमध्ये दिसली होती. ही वेब मालिका ऑल्ट बालाजीवर रिलीज झाली. यामध्ये तुषार कपूर मुख्य भूमिकेत होता. मल्लिका तिथे एका आत्म्याच्या भूमिकेत होती. वेब सिरीज हॉरर-कॉमेडी जॉनर होती.

मल्लिका शेरावतने २००३ साली आलेल्या 'ख्वाहिश' सिनेमातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. पहिल्या सिनेमात मल्लिकाने १७ किसिंग सीन्स दिल्यामुळे ती चर्चेत आली होती. मात्र, 'मर्डर' सिनेमातून मल्लिकाला प्रसिद्धी मिळाली. सिनेमाची गाणी चांगलीच हिट तर ठरलीच, पण इम्रानसोबतच्या मल्लिकाची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना खूप आवडली होती.

या चित्रपटाशिवाय 'ख्वाहिश', 'अनफेथफुल','हिस्स', 'डर्टी पॉलिटिक्स', 'तेज', 'वेलकम' तसेच हॉलिवूड, बॉलिवूडच्या सिनेमात झळकत तिने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Web Title: Mallika Sherawat is enjoying vacation in Kerala, photos came in front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.