इमरान हाश्मीचा ‘कॅप्टन नवाब’ रखडला! वाचा काय आहे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 06:00 AM2019-02-28T06:00:00+5:302019-02-28T06:00:02+5:30
इमरान हाश्मीने ब-याच दिवसांपूर्वी ‘कॅप्टन नवाब’ या चित्रपटाची घोषणा केली होती. पण घोषणा झाली आणि तिथेच विरली. मधल्या काळात या चित्रपटाबद्दलच्या चर्चाही थांबल्या. ताज्या बातमीनुसार, इमरानचा हा चित्रपट थंडबस्त्यात गेला आहे.
इमरान हाश्मीने बºयाच दिवसांपूर्वी ‘कॅप्टन नवाब’ या चित्रपटाची घोषणा केली होती. पण घोषणा झाली आणि तिथेच विरली. मधल्या काळात या चित्रपटाबद्दलच्या चर्चाही थांबल्या. ताज्या बातमीनुसार, इमरानचा हा चित्रपट थंडबस्त्यात गेला आहे. विशेष म्हणजे, याचे कारणही समोर आले आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचा विषय अतिशय संवेदनशील होता. यात इमरान भारत व पाकिस्तान अशा दोन्ही देशांसाठी हेरगिरी करणा-या हेराची भूमिका साकारताना दिसणार होता. संवेदनशील विषयामुळेच भारतीय लष्कराने या चित्रपटाला परवानगी नाकारली.
चित्रपटाचे दिग्दर्शक टोनी डिसूजा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चित्रपटात इमरान डबल एजेंटच्या रूपात आहे. आम्ही संरक्षण मंत्रालयास या चित्रपटाची स्क्रिप्ट पाठवली आहे. आम्हाला शूटींगसाठी त्यांच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. चित्रपटाचे एक शेड्यूल पूर्ण झाले आहे. पण पुढील शूटींगसाठी आम्हाला आर्मीच्या परवानगीची गरज आहे आणि ही परवानगी मिळाल्यानेच चित्रपट थंडबस्त्यात गेला आहे, असे त्यांनी सांगितले.
इमरानच्या या चित्रपटातून मालविका राज बॉलिवूड डेब्यू करणार होती. पण ‘कॅप्टन नवाब’ थंडबस्त्यात गेला म्हटल्यावर, मालविकाने दुसरा चित्रपट स्वीकारला. आता डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग याच्या ‘स्कॉड’ या चित्रपटातून तिचा डेब्यू होतोय. रिंजिंगचाही हा डेब्यू सिनेमा आहे. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात पू उर्फ पूजा शर्मा अर्थात करिना कपूरच्या बालपणीची भूमिका मालविकाने साकारली होती. ‘स्कॉड’ या चित्रपटाची कथा एका लहान मुलीच्या अवती-भवती फिरणारी आहे. ही मुलगी एका कटाची शिकार ठरते, असे याचे ढोबळ कथानक आहे.