"दिवसभर नवरात्रीचा उपवास अन् रात्री ताजमध्ये दारूचे २ पेग", ममता कुलकर्णीने सांगितलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:55 IST2025-02-05T11:54:22+5:302025-02-05T11:55:02+5:30
अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या ममताचा भुतकाळ तिचा पाठ सोडत नाहीये.

"दिवसभर नवरात्रीचा उपवास अन् रात्री ताजमध्ये दारूचे २ पेग", ममता कुलकर्णीने सांगितलं सत्य
अभिनय आणि सौंदर्याने ९०चं दशक बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) सध्या चर्चेत आहे. ममता कुलकर्णीने संन्यास घेत किन्नर आखाड्याची महामंडलेश्वरही बनली होती. पण, यावरुन मोठा वाद निर्माण झाल्याने अवघ्या सातच दिवसात तिला या पदावरुन काढून टाकण्यात आलं. किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाल्यामुळे तिच्यावर टीकाही करण्यात आली. अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या ममताचा भुतकाळ तिचा पाठ सोडत नाहीये. बोल्ड फोटोशूट ते दाऊदसोबतचे संबंधामुळे वादात राहिली आहे. ममतानं दिवसभर नवरात्रीचा उपवास आणि रात्री ताजमध्ये दारूचे २ पेग घेतले होते, असं बोललं जातं. यावर आता सत्य काय ते तिनं सांगितलं आहे.
ममता कुलकर्णीने नुकतंच रजत शर्मा यांच्या:'आप की अदालत' शो मध्ये साध्वी बनण्याचा प्रवासाबद्दल सांगितलं. यावेळी तिन नवरात्रीमध्ये दारू प्यायल्याचा पूर्वीचा किस्सा देखील सांगितला. मुलाखतीमध्ये तिला विचारलं की "तुम्ही नवरात्रीत उपवास करत होतात आणि रात्री ताज हॉटेलमध्ये स्कॉचचे दोन पेग घेत होतात?" यावर ती म्हणाली, "१९९७ मध्ये माझ्या गुरूंचा माझ्या आयुष्यात प्रवेश झाला. त्या वेळी मी बॉलिवूडमध्ये कार्यरत होते. शूटिंगला जाताना माझ्याकडे तीन बॅगा असायच्या. एका बॅग कपड्यांची, एक मंदिराची माझ्या खोलीतील टेबलावर माझं मंदिर असायचं. मी आधी टेबलवर देवाचं मंदिर ठेवायचे दर्शन करायचे आणि मग चित्रिकरणाला सुरुवात करायचे".
"मी तेव्हा नवरात्रीचं व्रत केलं होतं. या ९ दिवसांमध्ये दिवसातून तीनदा यज्ञ करण्याचा मी संकल्प केला होता. मी ते ९ दिवस केवळ पाणी पिऊन उपवास केला होता. दिवसातून तीन यज्ञ करत होते. 36 किलो चंदनाची लाकडं यज्ञात आहुतीसाठी वापरली. मात्र ९ दिवसांनंतर माझे जे डिझायनर होते, ते मला म्हणाले की ममता, "तू खूप गंभीर झाली आहेस, आता जरा रिलॅक्स हो!". त्याच्या आग्रहानंतर मग आम्ही ताज हॉटेलमध्ये गेलो. तिथे मी स्कॉचचे दोन पेग घेतले. त्या ९ दिवसांत काहीही न खाल्ल्यामुळे माझ्या शरीराला दारूचा त्वरित प्रभाव जाणवला. मग मी वॉशरूममध्ये जाऊन ४० मिनिटं बसून राहिले".