ममता कुळकर्णीचा पती विकी गोस्वामीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2017 12:55 PM2017-02-02T12:55:52+5:302017-02-02T18:25:52+5:30
ड्रग तस्करीच्या आरोपात फरार असलेला बॉलिवूड अभिनेत्री ममता कुळकर्णीचा पती व आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामीला अमेरिके च्या नर्कोटिक ...
ड रग तस्करीच्या आरोपात फरार असलेला बॉलिवूड अभिनेत्री ममता कुळकर्णीचा पती व आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामीला अमेरिके च्या नर्कोटिक डिपार्टमेंटने अटक केली आहे. विकी मागील काही वर्षांपासून केनियात होता. येथेच त्याला रविवारी अटक करण्यात आली. विकी गोस्वामीसोबत ड्रग माफिया गुलाम हुसैनचा मुलगा इब्राहिम, बख्ताश आक्शा यांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच मूळ पाकिस्तानी असलेल्या एका व्यक्तिची अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर ड्रग्स तस्करीचे आरोप असून सर्व फरारी होते.
इंडिया टुडेमध्ये आलेल्या बातमीनुसार, विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी हे दोघंही ड्रग्स माफियासंदर्भात फरारी आहेत. अमेरिकेच्या नाकोर्टिक्स डिपार्टमेंटने केलेल्या कारवाईनंतर सर्व अरोपींना अमेरिकेत नेण्यात आले आहे. दुसरीकडे विकी गोस्वामीचा पाठलाग ठाणे पोलिस करीत असून ते देखील त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले की, आम्ही भारतीय अधिकाºयांशी चर्चा करून, अमेरिकेतल्या आपल्या दुतावासाशी संपर्क करुन गोस्वामीला भारतात आणण्याचे प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत या प्रकरणात डीईए आणि ठाणे पोलीस यांच्यात चांगला संवाद होत आहे.
विकी गोस्वामी हा गुजरातमधील एका पोलीस आॅफिसरचा मुलगा आहे. ८० च्या दशकात त्याने गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले. काही वर्षांमध्ये त्याने दुबईपासून ते आफ्रीकेपर्यंत सर्वदूर पसरवले. भारतात, सोलापूर फार्मा युनिटमधून मोठ्या प्रमाणात मेथामफेटामाइन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात त्याचे नाव प्रामुख्याने समोर येत होते. दरम्यान त्याने अभिनेत्री ममता कुळकर्णीसोबत लग्न केले होते. दोघेही केनियात वास्तव्याला होते.
यापूर्वी ममता कुळकर्णीला विकी गोस्वामीसोबत अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर तिला सोडून देण्यात आले होते. विकीचा हा खटला ममताने तब्बल १२ वर्ष लढवला होता आणि त्याची तुरुंगातून सुटकाही केली होती. ममता कुलकर्णीचे नाव छोटा राजनसोबतही जोडले गेले होते. असे म्हटले डाते की, राजन याच्या म्हणण्यानुसार राजकुमार संतोषीने ममताला त्यांच्या चायनागेट या सिनेमात घेतले होते.