या अभिनेत्रीचा पहिला पती होता 'गे', काहीच महिन्यात झाला होता घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 07:00 AM2020-03-29T07:00:00+5:302020-03-29T07:00:02+5:30
या अभिनेत्रीच्या पतीचे एका फॅशन डिझायनरसोबत संबंध होते.
मंदना करिमीने भाग जॉनी, क्या कूल है हम ३ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये देखील ती झळकली होती. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही बिग बॉसमुळे मिळाली. तिने इश्कबाज या स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेत काम देखील केले आहे. मंदनाचा काहीच दिवसांंपूर्वी म्हणजेच १९ मार्चला वाढदिवस झाला. आज मंदनाच्या खाजगी आयुष्याविषयी काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मंदनाची दोन लग्न झाली असून तिच्या पहिल्या पतीसोबत तिने काहीच वर्षांत घटस्फोट घेतला. तिचा पहिला पती 'गे' असल्याने तिने लग्नाच्या काहीच दिवसांत त्याला सोडण्याचा निर्णय घेतला होता. २०११ मध्ये मंदनाने ललित तेहलान याच्याशी सीक्रेट मॅरेज केले होते. मात्र या लग्नानंतर ललित हा 'गे' असल्याचे मंदनाला कळले आणि तिने त्याला सोडचिठ्ठी दिली. ललित आणि फॅशन डिझाईनर रोहित बल हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. ललित आणि रोहित या दोघांना अनेक ठिकाणी इंटिमेट होताना पाहण्यात आले होते. पण २०११ मध्ये ललित आणि रोहित या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता यानंतर काहीच महिन्यांनी म्हणजेच १८ फेब्रुवारी २०११ ला ललितने आर्य समाज मंदिरात मंदनाशी लग्न केले होते. मंदनाने केवळ भारतीय नागरिकत्वासाठी ललितसोबत लग्न केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.
ललितशी घटस्फोट झाल्यानंतर मंदनाने गौरव गुप्ता या बिझनेसमनोबत लग्न केले होते. लग्नाला काहीच महिने झाले असता त्यांच्यात कुरबुरी सुरू झल्या होत्या. तिने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार देखील दाखल केली होती. पण काही काळानंतर तिने ही केस मागे घेतली होती. पण त्यानंतर काहीच महिन्यांमध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
१९ मार्च १९८८ रोजी तेहरान(इराण)मध्ये जन्मलेल्या मंदनाने एअरहोस्टेस म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली. ‘भाग जॉनी’मधून तिने बॉलिवूड डेब्यू केले होते. अनेक चित्रपटांत आयटम साँग आणि लहान-मोठ्या भूमिका केल्यानंतर मंदनाला ‘क्या कुल है हम3’ मध्ये पहिल्यांदा लीड रोल साकारण्याची संधी मिळाली.