कौतुकास्पद! अभिनेत्री मंदिरा बेदीने दत्तक घेतली ४ वर्षांची मुलगी तारा, शेअर केला मुलीसोबतचा फोटो...

By अमित इंगोले | Published: October 26, 2020 10:21 AM2020-10-26T10:21:27+5:302020-10-26T10:21:46+5:30

मंदिरा बेदीने एक चार वर्षांची मुलगी दत्तक घेतली असून सेलिब्रिटीसोबतच फॅन्सही तिची प्रशंसा करत आहेत.

Mandira Bedi and Raj Kaushal adopts a 4 year baby girl Tara and shares picture with her on social media | कौतुकास्पद! अभिनेत्री मंदिरा बेदीने दत्तक घेतली ४ वर्षांची मुलगी तारा, शेअर केला मुलीसोबतचा फोटो...

कौतुकास्पद! अभिनेत्री मंदिरा बेदीने दत्तक घेतली ४ वर्षांची मुलगी तारा, शेअर केला मुलीसोबतचा फोटो...

googlenewsNext

आपल्या अ‍ॅक्टिंगसोबतच फिटनेसमुळेही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री मंदिरा बेदी आणि तिचा पती राज कौशल यांनी एक ४ वर्षांची मुलगी दत्तक घेतली आहे. या कपलने २८ जुलै २०२० ला या मुलीला दत्तक घेतलं होतं. पण फोटो आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मंदिरा बेदी आणि राज कौशल मुलीला दत्तक घेण्याची प्रोसेस करत होते. ती आता यावर्षी पूर्ण झाली.

मंदिराच्या या मुलीचं नाव तारा आहे. सोशल मीडियावर मुलीसोबत आपल्या परिवाराचा फोटो मंदिराने शेअर करत याची फॅन्सना माहिती दिली. मंदिरा आणि राज यांना आधीच एक ९ वर्षांचा मुलगा आहे. मंदिराने फोटोसोबत पोस्टमध्ये लिहिले की, 'आमची लहान मुलगी तारा आमच्याकडे देवाच्या आशीर्वादासारखी आली आहे.  ४ वर्षाची मुलगी जिचे डोळे ताऱ्यासारखे चमकतात. वीरने त्याच्या बहिणीचं प्रेमाने स्वागत केलं. तारा बेदी-कौशल २८ जुलै २०२० ला आमच्या परिवाराची सदस्य झाली'. 

मंदिराने जसेही हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे लगेच सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. सेलेब्ससोबतच फॅन्सही मंदिराला शुभेच्छा देत आहेत आणि या कामासाठी तिची प्रशंसा करत आहे. दरम्यान मंदिराने 'शांति' मालिकेतून डेब्यू केलं होतं. त्यानंतर ती शाहरूख खानसोबत 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मध्ये दिसली होती. मंदिरा शेवटची 'साहो' सिनेमातही दिसली होती.
 

Web Title: Mandira Bedi and Raj Kaushal adopts a 4 year baby girl Tara and shares picture with her on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.