पतीला अखेरचा निरोप देताना मंदिरा बेदीच्या दुःखाला पारावार उरला नाही; सगळ्यांचंच मन हेलावलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 12:35 PM2021-06-30T12:35:50+5:302021-06-30T15:15:54+5:30
Raj Kaushals Funeral : मंदिराचा आक्रोश बघून अनेकांना अश्रू अनावर झालेत. हे दृश्य मन हेलावणारे होते.
फिटनेस स्टार व बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मंदिरा बेदीच्या (Mandira Bedi) पतीचं निधन झाल्याची बातमी आली आणि बॉलिवूडवर शोककळा पसरली. आज पहाटे मंदिराचा पती राज कौशल (Raj Kaushal Death) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज यांच्या निधनानंतर मंदिरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पतीला अखेरचा निरोप देताना मंदिरा ढसाढसा रडली. (Mandira Bedi broke down)
पतीचे पार्थिव रूग्णवाहिकेत ठेवत असताना मंदिराला जोरजोरात रडू लागली. तिची अवस्था अनेकांना बघवत नव्हती. मंदिराला रडताना बघून तिचा मित्र रोनित रॉयने तिला सांभाळले. रोनितच्या गळ्यात पडून मंदिरा ओक्साबोक्सी रडत होती.
रविवारी रात्री मंदिरा, राज व मित्रांनी पार्टी केली होती. सोमवारी त्यांनी या पार्टीचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. या पार्टीत क्रिकेटर झहीर खान, सागरीका घाटगे, नेहा धुपिया, आंगद बेदी हे ही सामील होते.
रविवारीच त्यांच्या घरी झालेल्या पार्टीत ते अगदी आनंदी होते. तर सगळ्यांसोबत चांगला वेळही घालवत होते. पण बुधवारी सकाळी अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.
पत्नी अभिनेत्री मंदीरा बेदीला यामुळे मोठा धक्का बसला आहे. राज यांच्या जाण्याने मंदीराच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दोघांचही एकमेकांवर खूप प्रेम होतं. मंदिरा आणि राज यांना दोन मुलं आहेत. तर एका मुलीला त्यांनी दत्तक घेतलं आहे. राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. प्यार में कभी कभी, अँथनी कौन है, शादी का लड्डू या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. राज कौशल यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.