आभाळाएवढं दु:ख तिनं ‘इमोजी’तून मांडलं..., पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीची पहिली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 04:13 PM2021-07-05T16:13:17+5:302021-07-05T16:15:36+5:30

पतीच्या निधनानंतर सहा दिवसांनी मंदिरानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

mandira bedi first instagram post after huband raj kaushal death |   आभाळाएवढं दु:ख तिनं ‘इमोजी’तून मांडलं..., पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीची पहिली पोस्ट

  आभाळाएवढं दु:ख तिनं ‘इमोजी’तून मांडलं..., पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीची पहिली पोस्ट

googlenewsNext
ठळक मुद्दे राज कौशल दिग्दर्शक आणि निर्माते होते. राज यांनी 2 चित्रपट दिग्दर्शित केले आणि 3 चित्रपटांची निर्मिती केली होती. 

छोट्या पडद्यापासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणा-या मंदिरा बेदीवर (Mandira Bedi ) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या बुधवारची पहाट मंदिराच्या आयुष्यात जणू वादळ घेऊन उगवली. या वादळानं मंदिराचं अख्ख ‘विश्व’ हिरावून घेतलं. बुधवारी पहाटे मंदिराचा पती आणि निर्माता-दिग्दर्शक राज कौशल (Rraj Kkaushal) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. पतीच्या आकस्मिक निधनाने मंदिरा बेदीला प्रचंड धक्का बसला आहे. पतीच्या अंत्ययात्रेत मंदिराची अवस्था बघवत नव्हती. तिचे अश्रू थांबत नव्हते. आता पतीच्या निधनानंतर सहा दिवसांनी मंदिराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. (Mandira Bedi first Instagram post after huband Raj Kaushal death)

पतीच्या निधनानंतरची तिची ही पहिली पोस्ट आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने राज यांच्यासोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत. फोटोत दोघंही आनंदात दिसत आहेत. या पोस्टसोबत मंदिरानं काहीही लिहिलेलं नाही. शेअर केला तो केवळ एक इमोजी. आभाळाएवढं दु:ख तिनं फक्त या एका इमोजीतून व्यक्त केलं.

मंदिराची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या दु:खाची कल्पना आपण करू शकतो. अनेक सेलेब्रिटींनी मंदिराच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिला धीर दिला आहे. सायना नेहवाल, हरभजन सिंग, अमृता सुभाष, अधुना, मिथिला पालकर, अरमान मलिक या सेलेब्रिटींनी काही क्षणातच मंदिराच्या पोस्टला रिप्लाय केलेत. पतीच्या निधनानंतर मंदिरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बदल केले आहेत.  प्रोफाइल फोटो काढून तिने त्या जागी काळ्या रंगाचा फोटो ठेवला आहे. ट्विटरवर मात्र तिनं काहीही बदल केलेला नाही.  
 मंगळवारी संध्याकाळीच राज यांना छातीत दुखत होतं. मला छातीत दुखतंय, असं त्यांनी मंदिराला सांगितलं होतं. पण त्यांना मंदिरा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तोपर्यंत फार उशीर झाला होता. अलीकडे ई टाइम्सशी बोलताना सुलेमान मर्चंट यांनी ही माहिती दिली होती. 
 राज कौशल दिग्दर्शक आणि निर्माते होते. राज यांनी 2 चित्रपट दिग्दर्शित केले आणि 3 चित्रपटांची निर्मिती केली होती. 

Web Title: mandira bedi first instagram post after huband raj kaushal death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.