मंदिरा बेदीने अशा दिल्या ‘करवा चौथ’च्या शुभेच्छा, फोटो पाहून नेटक-यांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:23 AM2019-10-18T11:23:51+5:302019-10-18T11:30:45+5:30
मंदिरा बेदी हिने एक फोटो शेअर करत लोकांना ‘करवा चौथ’च्या शुभेच्छा दिल्यात. पण तिचा फोटो बघताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
गुरुवारी देशभर ‘करवा चौथ’चा सण साजरा झाला. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनीही पारंपरिक पद्धतीने ‘करवा चौथ’चे व्रत केले. सोबत या सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केलेत. अनुष्का शर्मा, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, बिपाशा बासू अशा अनेक अभिनेत्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ‘करवा चौथ’ साजरा करताना दिसल्या. अभिनेत्री मंदिरा बेदी हिनेही एक फोटो शेअर करत लोकांना ‘करवा चौथ’च्या शुभेच्छा दिल्यात. पण तिचा फोटो बघताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. हा फोटो पाहिल्यानंतर युजर्स इतके भडकले की, त्यांनी मंदिराला अश्लिल भाषेत ट्रोल केले.
मंदिराने पतीसोबतचा फोटो शेअर केला. ‘करवा चौथ’च्या संध्याकाळी शेअर करण्यात आलेल्या या फोटोत मंदिरा साडीत दिसतेय. तिच्या कपाळावर लाल मोठी टिकली दिसतेय. इथपर्यंत सगळे ठीक आहे. फोटोत आणखी एक गोष्ट दिसली. ती म्हणजे वाईनचे ग्लास. होय, मंदिरा व तिच्या पतीच्या हातात वाईनचे ग्लास आहेत. नेमक्या याच वाईनच्या ग्लासमुळे मंदिरा ट्रोल झाली. मंदिराने वाईनचा ग्लास हातात घेऊन ‘करवा चौथ’च्या शुभेच्छा देणे सोशल मीडिया युजर्सला रूचले नाही. हा फोटो बघताच युजर्सनी तिला प्रचंड ट्रोल केले.
‘करवा चौथ’ साजरा करणार नसशील तर हरकत नाही. पण किमान भारतीय संस्कृतीशी असे धिंडवडे काढू नकोस, असे लोकांनी तिला बजावले. एका युजरने तर तिला चांगलेच फैलावर घेतले. ‘ऐ म्हातारे वेडी झालीस का?’ अशा भाषेत या युजरने मंदिराला ट्रोल केले.
मंदिरा बेदीने 1999 मध्ये निमार्ता राज कौशलसोबत लग्न केले. तिला ८ वर्षांचा मुलगा आहे.