भाड्याचं घर ते कोट्यवधींच्या बंगल्याची मालकीण, थक्क करणार आहे या अभिनेत्रीचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 12:01 IST2023-04-15T11:58:27+5:302023-04-15T12:01:12+5:30
पतीच्या निधनानंतर ती दोनही मुलांचं संभाळ एकटीच करते आहे.

भाड्याचं घर ते कोट्यवधींच्या बंगल्याची मालकीण, थक्क करणार आहे या अभिनेत्रीचा प्रवास
बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी ( (Mandira Bedi ) हिचा आज वाढदिवस. 15 एप्रिल 1972 रोजी जन्मलेली मंदिरा फिल्म इंडस्ट्रीत आली तेव्हा एक साधीभोळी मुलगी होती. आज तिला पाहून कुणीही थक्क होईल. (Mandira Bedi transformation) छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मंदिरा आज पुरती बदलली आहे.
1994 साली दूरदर्शनवरील ‘शांती’ या मालिकेतून मंदिराने करिअरला सुरुवात केली.शांती या मालिकेनंतर आहट, औरत, घर जमाई, क्योंकि सास भी कभी बहू थी अशा लोकप्रिय मालिकांमध्ये ती झळकली. पुढे क्रिकेटच्या फिल्डवर तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. क्रिकेटचे बारकावे समजावणा-या मंदिराचा तो अवतार प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. मंदिरा आज कोट्यवधींची मालकिण आहे, पण तुम्हाला माहित आहे का की एकेकाळी ही अभिनेत्री मुंबईत भाड्याच्या घरात राहायची?
मंदिरा आज तिच्या आलिशान बंगल्यात राहते. मंदिरा 'रामा' बंगल्याची मालकीण आहे.मंदिराच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीकडे टाटा नेक्सन ईव्ही आणि मर्सिडीज बेंझ ए क्लास कार आहेत. मंदिरा बेदी आज करोडोंमध्ये खेळतात. अभिनेत्रीची एकूण संपत्ती 2.3 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 18 कोटी रुपये आहे. मंदिराच्या कमाईचा सर्वात मोठा हिस्सा चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून येतो. एका चित्रपटासाठी ती 50 लाख ते 1 कोटी रुपये मानधन घेते.
मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे ३० जून २०२१ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दोघेही चांगल्या वाईट परिस्थितीत एकमेकांसोबत उभे राहिले. मंदिरा एकटीच दोन्ही मुलांचे पालन करत आहे.