मंदिरा बेदीने केली फेस सर्जरी? व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केली प्रश्नांची सरबत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 13:33 IST2024-04-07T13:23:08+5:302024-04-07T13:33:43+5:30
Mandira bedi: मंदिराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मंदिरा बेदीने केली फेस सर्जरी? व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केली प्रश्नांची सरबत्ती
लोकप्रिय अभिनेत्री मंदिरा बेदी (mandira bedi) हिने गेल्या काही काळापासून रुपेरी पडद्यापासून फारकत घेतली आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. मंदिरा कायम तिच्या विषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. विशेष म्हणजे तिच्या फिटनेसची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. परंतु, यावेळी ती तिच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत आली आहे. इतकंच नाही तर अनेकांनी तिला चेहऱ्याची सर्जरी केलीस का? असाही प्रश्न विचारला आहे.
मंदिराने अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला चेहऱ्याची सर्जरी केलीस का? असा प्रश्न विचारला आहे.
नेमकं काय म्हणाले नेटकरी?
'तुझा चेहरा खूपच वेगळा वाटतोय', 'अरे, तुम्ही चेहऱ्याला काही केलंय का?' , 'किती छान दिसायचीस तू, सर्जरी केलीस का?' ,' सर्जरी बिघडली वाटतं?' , 'डाएटमध्ये काही बदल झाला का?' असे कितीतरी प्रश्न नेटकऱ्यांनी तिला विचारले आहेत.
दरम्यान, मंदिराने खरोखरच सर्जरी केलीये की काय? या मागचं सत्य अद्यापतरी समोर आलेलं नाही. मंदिराने छोट्या पडद्यापासून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकली. दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे या सिनेमामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तसंच तिने अनेक रिअॅलिटी शो, क्रिकेट मॅचमध्ये समालोचनाचं काम केलं आहे. २०२१ मध्ये मंदिराच्या पतीचं निधन झालं.