लग्नानंतर प्रेग्नेंसीपासून 12 वर्षे दूर राहिली अभिनेत्री मंदिरा बेदी, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 03:45 PM2021-03-13T15:45:49+5:302021-03-13T16:00:12+5:30

मंदिरा तिचे वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Mandira bedi says ‘I put motherhood on hold for 12 years due to my career’ | लग्नानंतर प्रेग्नेंसीपासून 12 वर्षे दूर राहिली अभिनेत्री मंदिरा बेदी, कारण वाचून व्हाल हैराण

लग्नानंतर प्रेग्नेंसीपासून 12 वर्षे दूर राहिली अभिनेत्री मंदिरा बेदी, कारण वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

अभिनेत्री मंदिरा बेदी झगमगत्या दुनियेपासून लांब असली तरी ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. मंदिरा सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी ओलांडली आहे. या वयातही मंदिरा बेदीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे.


आजतकच्या रिपोर्टनुसार मंदिराने  दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या पर्सनल लाईफबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला. मंदिराने सांगितले की, करिअरमुळे जवळपास 12 वर्षे ती आई होण्यापासून दूर पळत राहिली. कारण मनोरंजन जगात महिलांचा करिअर जास्त मोठं नसतं. टिव्ही आणि सिनेमांमध्ये जास्त काम करणाऱ्या महिलांबाबत मला असुरक्षिततेची भावना होती.


मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर 12 वर्षांनी मंदिरा मुलं झालं. मंदिराने पुढे सांगितले की, माझ्या करारांनी मला प्रेग्नेंट होऊ दिले नाही. मला भीती होती की जर मी प्रेग्नेंट राहिले तर माझं करिअर संपले. माझ्या पतीमुळे आमचा संसार यशस्वी होऊ शकला. मंदिराला वीर नावाचा ९ वर्षांचा मुलगा आहे. त्यानंतर  ​गेल्या वर्षी मंदिराने एक मुलगी दत्तक घेतली. तारा बेदी कौशल असं मुलीचं नावही ठेवलं. स्वतः मंदिराने मुलगी दत्तक घेतल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती.  

Web Title: Mandira bedi says ‘I put motherhood on hold for 12 years due to my career’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.