मनीष पॉलने खरेदी केली लक्झरी Mercedes GLS 400 कार; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 17:16 IST2022-03-03T17:14:18+5:302022-03-03T17:16:42+5:30
Maniesh paul: मनीषने खरेदी केलेली ही कार प्रचंड महाग अून त्याची किंमत थक्क करणारी आहे. विशेष म्हणजे मनीषने कार खरेदी केल्यानंतर तो पत्नी संयुक्ताला घेऊन लंच डेटलाही गेल्याचं सांगण्यात येतं.

मनीष पॉलने खरेदी केली लक्झरी Mercedes GLS 400 कार; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आणि सूत्रसंचालक म्हणजे मनीष पॉल (Maniesh Paul). प्रोफेशनल लाइफसोबतच अनेकदा मनीष त्याच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असतो. त्यामुळे त्याच्या जीवनात काय घडतं हे जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. मनीषला लक्झरी लाइफस्टाइल आवडते हे अनेकांना माहित आहे. विशेष म्हणजे त्याच्या या लॅव्हिश जीवशैलीची झलक त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही पाहायला मिळते. यामध्येच आता मनीषने त्याच्या गाड्यांच्या ताफ्यातमध्ये चक्क मर्सिडीज जी एल एस 400 ही (Mercedes GLS 400) या नव्या कोऱ्या गाडीचा समावेश केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे.
विरल भय्यानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर मनीषच्या नव्या कोऱ्या गाडीचे काही फोटो शेअर केले आहे. मनीषने खरेदी केलेली ही कार प्रचंड महाग अून त्याची किंमत थक्क करणारी आहे. विशेष म्हणजे मनीषने कार खरेदी केल्यानंतर तो पत्नी संयुक्ताला घेऊन लंच डेटलाही गेल्याचं सांगण्यात येतं.
किती आहे मनीषच्या कारची किंमत?
मनीषने मर्सिडीज जी एल एस 400 ही (Mercedes GLS 400) ही कार खरेदी केली असून त्याची किंमत १.६५ कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येतं. एकेकाळी मनीषकडे कोणत्याही प्रकारचं काम नव्हतं. परंतु, प्रयत्न आणि जिद्द यांच्या जोरावर त्याने हे यश, प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळेच आज तो हवी ती गोष्ट सहज खरेदी करु शकतो हे दिसून येतं. विशेष म्हणजे २०१८ मध्ये त्याच्याकडे काम नव्हतं. त्यामुळे घर भाडं देणंही त्याला शक्य नव्हतं. मात्र, त्याच्या या संकट काळात पत्नी संयुक्ताने घराची पूर्ण जबाबदारी उचलली.