कंगना राणौतच्या आयुष्यातही आहे कुणी खास! पर्सनल लाईफबद्दल केला मोठा खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 01:43 PM2019-03-03T13:43:08+5:302019-03-03T13:43:17+5:30
आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्थात कुठल्या चित्रपटामुळे नाही तर आपल्या पर्सनल लाईफबद्दल केलेल्या एका खुलाशामुळे.
ठळक मुद्दे‘मणिकर्णिका’नंतर कंगना ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ या दोन चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘इमली’ या चित्रपटातही ती झळकणार आहे.
कंगना राणौतच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धूम केली. या चित्रपटात कंगनाने झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही आपल्या खांद्यावर घेतली. या चित्रपटादरम्यान कंगनाची बरीच चर्चा झाली. आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्थात कुठल्या चित्रपटामुळे नाही तर आपल्या पर्सनल लाईफबद्दल केलेल्या एका खुलाशामुळे.
होय, आजपर्यंत कंगना सिंगल आहे, असेच मानले जात होते. पण कंगना मुळीच सिंगल नाही. तिच्या आयुष्यातही कुणीतरी आहे. एका ताज्या इव्हेंटमध्ये बोलताना कंगनाने याबाबतचा खुलासा केला. ‘माझ्या आयुष्यातही कुणीतरी आहे. पण सध्या मला दररोज डेटिंगची गरज नाही. आज मी वयाच्या त्या टप्प्यावर आहे, जिथे मला एका साथीदाराची गरज आहे. जो मला प्रेरणा देईल, प्रोत्साहन देईल,’ असे कंगनाने यावेळी सांगितले.
केवळ इतकेच नाही तर मी खऱ्या आयुष्यात अतिशय रोमॅन्टिक आहे, हेही तिने सांगितले. मी सुद्धा रोमॅन्टिक आहे. एक कलाकार म्हणून महत्त्वाकांक्षा असायला हवी. पण प्रेमावरही माझा तितकाच विश्वास आहे. मी आयुष्यात कधीही प्रेमाशिवाय राहिलेली नाही. प्रेमात माझ्या वाट्याला अनेक कटू अनुभव आलेत. पण हे कटू अनुभव कुरवाळत बसण्याऐवजी मी लगेच यातून बाहेर पडले, असे ती म्हणाली.
लग्नाबद्दलही ती बोलली. मी नक्कीचं लग्न करणार. स्वत:चे कुटुंब असावे, असे मला नेहमीच वाटते. अर्थात मी कधी लग्न करणार, हे मात्र मला ठाऊक नाही, असे तिने सांगितले.
‘मणिकर्णिका’नंतर कंगना ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ या दोन चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘इमली’ या चित्रपटातही ती झळकणार आहे.