ठरले ! ‘मणिकर्णिका’साठी कंगना राणौतला मिळणार दिग्दर्शनाचे श्रेय!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 01:42 PM2018-12-17T13:42:21+5:302018-12-17T13:46:39+5:30

कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. उद्या १८ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय. पण त्याआधी एक मोठी बातमी आहे. होय, या चित्रपटासाठी कंगनाला दिग्दर्शनाचे क्रेडिट मिळणार आहे.

manikarnika producer kamal jain reveals directors credit will surely be given to kangana ranaut | ठरले ! ‘मणिकर्णिका’साठी कंगना राणौतला मिळणार दिग्दर्शनाचे श्रेय!!

ठरले ! ‘मणिकर्णिका’साठी कंगना राणौतला मिळणार दिग्दर्शनाचे श्रेय!!

googlenewsNext
ठळक मुद्देहोय, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ चे निर्माते कमल जैन यांनी कंगनाला दिग्दर्शनाचे श्रेय मिळेल, असे ठणकावून सांगितले आहे. ताज्या मुलाखतीत ते यावर बोलले.

कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. उद्या १८ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय. पण त्याआधी एक मोठी बातमी आहे. होय, या चित्रपटासाठी कंगनाला दिग्दर्शनाचे क्रेडिट मिळणार आहे. म्हणजेचं श्रेय नामावलीत दिग्दर्शिका म्हणून कंगना राणौतचे नाव झळकणार आहे.
क्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत क्रिश आपल्या दुस-या प्रोजेक्टमध्ये बिझी झालेत. त्यांच्या अनुपस्थित चित्रपटाचे काम कोण पुढे नेणार हा प्रश्न असताना कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. यानंतर चित्रपटाच्या क्रेडिट लाईनमध्ये दिग्दर्शकाच्या नावावरून वेगवेगळी चर्चा सुरू झाली. क्रेडिट लाईनमध्ये कंगनाचे नाव असेल, असे काहींनी म्हटले. काहींनी ती सहदिग्दर्शक म्हणून क्रेडिट घेणार, असे सांगितले तर काहींनी दिग्दर्शनाचे क्रेडिट घेण्यास कंगनाने नकार दिल्याचेही सांगितले. पण आता ताज्या बातमीनंतर सगळे काही स्पष्ट झाले आहे.


होय, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ चे निर्माते कमल जैन यांनी कंगनाला दिग्दर्शनाचे श्रेय मिळेल, असे ठणकावून सांगितले आहे. ताज्या मुलाखतीत ते यावर बोलले. क्रिशच्या अनुपस्थित कंगनाने समर्थपणे दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली. कॉन्च्युमपासून तर दिग्दर्शन, कॅमेरा अँगल सगळे काही अगदी प्रोफेशनल व्यक्तिला लाजवेल, असे काम तिने केले. या चित्रपटात तिने अभिनय केला, पटकथेत योगदान दिले आणि दिग्दर्शनही केले. दिग्दर्शनात ती नवखी आहे, असे चुकूनही आम्हाला जाणवले नाही.

निर्माता या नात्याने तिला दिग्दर्शनाचे के्रडिट मिळायला हवे, असे माझे प्रामाणिक मत आहे. कुणी एक दिवस जरी दिग्दर्शन केले तरी त्याला दिग्दर्शनाचे क्रेडिट मिळायला हवे. कंगनाने तर ७० टक्के काम केले आहे. तिला क्रेडिट न मिळणे, अन्याय होईल. तिने क्रेडिट घ्यायला नकार दिला. तरी मी तिला ते देईल, असे कमल जैन म्हणाले.

Web Title: manikarnika producer kamal jain reveals directors credit will surely be given to kangana ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.