Box Office Report : कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ने चौथ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 01:10 PM2019-01-29T13:10:19+5:302019-01-29T13:10:51+5:30
गत चार दिवसांत या चित्रपटाने ४७ कोटी रूपयांची कमाई केली आहे. काल सोमवारी म्हणजे, दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कंगनाच्या या चित्रपटाने शानदार बिझनेस केला.
कंगना राणौतचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ गत आठवड्यात चित्रपटगृहांत झळकला आणि रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा मिळवला. चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झालेत आणि या चार दिवसांत या चित्रपटाने बक्कळ कमाई केली.
होय, ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गत चार दिवसांत या चित्रपटाने ४७ कोटी रूपयांची कमाई केली आहे. काल सोमवारी म्हणजे, दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कंगनाच्या या चित्रपटाने शानदार बिझनेस केला. अर्थात चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत ४१.७१ टक्क्यांची घसरण झाली.
#Manikarnika is decent on crucial Mon. Decline on Day 4 [vis-à-vis Day 1]: 41.71%... North circuits continue to lead... Week 1 should be close to ₹ 60 cr [as per trends]... Fri 8.75 cr, Sat 18.10 cr, Sun 15.70 cr, Mon 5.10 cr. Total: ₹ 47.65 cr. India biz. #Hindi#Tamil#Telugu
— taran adarsh (@taran_adarsh) January 29, 2019
रिलीजच्या पहिल्याच दिवशी धमाकेदार सुरुवात करत, या चित्रपटाने ८.७५ कोटी रूपये कमावले. यानंतर दुस-याचं दिवशी सगळ्यांना धक्का देत, थेट १८.१० कोटींवर झेप घेतली. रविवारी हा चित्रपट पाहायला प्रेक्षकांच्या रांगा लागल्या आणि या चित्रपटाने १५.७० कोटींची कमाई केली. सोमवारी या चित्रपटाने ५.१० कोटी कमावले. कमाईचा एकूण आकडा ४७.६५ कोटींच्या घरात आहे.
A queen, a mother, a warrior... She will win you over with her courage & spirit⚔#ManikarnikaInCinemas : https://t.co/oN0H8Jo9nc@ZeeStudios_@KamalJain_TheKJ#KanganaRanaut@anky1912@shariqpatel@prasoonjoshi_@DirKrish@ShankarEhsanLoy@neeta_lulla#VijayendraPrasadpic.twitter.com/dkVpIkdELW
— Manikarnika: The Queen of Jhansi (@ManikarnikaFilm) January 29, 2019
जाणकारांचे मानाल तर या आठवड्या हा चित्रपट ६० कोटींपर्यंतचा पल्ला गाठू शकतो. या चित्रपटात कंगनाने झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली आहे. सोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिने केले आहे. चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक होतेय. तिच्या दिग्दर्शनाचीही प्रशंसा होतेय. राणी लक्ष्मीबार्इंचा संघर्ष, त्यांचे शौर्य असे सगळे या चित्रपटात दाखवले आहे. हिंदी शिवाय तामिळ व तेलगू अशा एकूण तीन भाषांत हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. कंगनाशिवाय अतुल कुलकर्णी, सुरेश ओबेरॉय, डॅनी, वैभव तत्ववादी यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अंकिता लोखंडेने या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला आहे.