सलमान खानला होती 'मन्नत' बंगल्याची ऑफर, भाईजानच्या नकारानंतर किंग खान झाला मालक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 05:34 PM2023-09-27T17:34:44+5:302023-09-27T17:34:44+5:30
असं काय झालं की बंगला शाहरुखने खरेदी केला वाचा..
मुंबईतील सर्वात आलिशान आणि महागड्या बंगल्यांची नावं घेतली तर त्यात 'मन्नत' (Mannat) या बंगल्याचा समावेश होईल. बांद्रा च्या समुद्रकिनारी असलेला हा बंगला बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची (Shahrukh Khan) खास ओळख आहे. स्विमिंग पूल, होम थिएटर, जीम आणि काय नाही या बंगल्यात. २२ वर्षांपूर्वी २००१ साली त्याने हा बंगला खरेदी केला होता. पण तुम्हाला माहितीये का मन्नत खरंतर भाईजान सलमान खानचा (Salman Khan)असता. असं काय झालं की बंगला शाहरुखने खरेदी केला वाचा..
मन्नतचे मालक नरीमन दुबाश हे गुजराती बिझनेसमॅन होते. तेव्हा बंगल्याचं नाव मन्नत नव्हतं तर 'व्हिला विएना' असं होतं. शाहरुखने बंगला खरेदी केल्यानंतर त्याने मन्नत हे नाव दिलं. हा बंगला त्यावेळी शाहरुखने 13.32 कोटी रुपयांना खरेदी केला होता. तर आज बंगल्याची किंमत तब्बल 200 कोटी रुपये आहे. शाहरुखसाठी हे केवळ घर नाही तर त्याची मन्नतच आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा बंगला विकताना सर्व प्लॅनिंगनुसार झालं असतं तर आज सलमान खान या बंगल्याचा मालक असला असता.
सलमानने नाकारली ऑफर
माध्यम रिपोर्ट्सनुसार, नरीमन दुबाश यांना 'व्हिला विएना' विकायचा होता. तेव्हा ते यासाठी खरेदी करणारी पार्टी शोधत होते. शाहरुखआधी त्यांनी सलमान खानला ऑफर दिली होती. मात्र सलमानने वडील सलीम खान यांच्या सांगण्यावरुन बंगला खरेदी करण्यास नकार दिला. इंडिया टूडेच्या एका मुलाखतीत सलमानला विचारण्यात आलं की असं काय आहे जे शाहरुखजवळ आहे पण तुझ्याकडे नाही? यावर सलमान म्हणाला,'मन्नत बंगला खरेदी करण्याची ऑफर आधी माझ्याकडे आली होती. पण तेव्हा माझ्या करिअरची सुरुवात होती. वडील म्हणाले इतक्या मोठ्या घरात तू काय करणार. त्यामुळे आता मला शाहरुखला विचाराचं आहे की इतक्या मोठ्या घरात काय करतो तू?'