Bhaiyaa Ji OTT Release : मनोज वाजपेयीचा "भैय्याजी" ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:30 PM2024-07-22T12:30:06+5:302024-07-22T12:34:14+5:30

प्रेक्षकांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. आज चित्रपटगृहांनंतर ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित ...

Manoj Bajpayee Bhaiya Ji Release to ZEE5 OTT | Bhaiyaa Ji OTT Release : मनोज वाजपेयीचा "भैय्याजी" ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे

Bhaiyaa Ji OTT Release : मनोज वाजपेयीचा "भैय्याजी" ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे

प्रेक्षकांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. आज चित्रपटगृहांनंतर ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला अभिनेते मनोज वाजपेयी यांचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट ''भैय्याजी'' आता लवकरच ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 24 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता त्याची ओटीटी रिलीज डेटही आली आहे.

अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित ''भैय्याजी'' हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये मनोज वाजपेयी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यात हा चित्रपट अयशस्वी ठरला असला तरी OTT वर हा चित्रपट कधी येतो, याची वाट पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर येणार आहे.  हा चित्रपट 26  जुलै रोजी  ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींचा ''भैय्याजी'' हा 100 वा सिनेमा आहे.  या चित्रपटाची पटकथा सामान्य दर्जाची असली तरी मनोज यांनी आपल्या कॅरेक्टरला योग्य न्याय दिला आहे. अनेकांना हा सिनेमा पाहून 'गँग्ज ऑफ वासेपूर' सिनेमाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात काय तर मनोजचा पुन्हा तोच जुना अंदाज बघण्यासाठी हा चित्रपट पाहायला हरकत नाही.

Web Title: Manoj Bajpayee Bhaiya Ji Release to ZEE5 OTT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.