विजय वर्माची 'ही' भूमिका मला मिळायला हवी होती, मनोज वायपेयींनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 10:46 AM2023-07-06T10:46:22+5:302023-07-06T10:47:35+5:30

अमिताभ बच्चन यांचा सिनेमा पाहून प्रेरित

manoj bajpayee jealous with vijay varma for his role in dahad web series | विजय वर्माची 'ही' भूमिका मला मिळायला हवी होती, मनोज वायपेयींनी केला खुलासा

विजय वर्माची 'ही' भूमिका मला मिळायला हवी होती, मनोज वायपेयींनी केला खुलासा

googlenewsNext

अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. त्यांच्या दमदार अभिनयन कौशल्यासाठी ते औळखले जातात. ना कोणती तक्रार ना काही कोणता अ‍ॅटिट्यूड मनोज वायपेयींनी उत्तम काम करुन बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. पण नुकतंच त्यांनी विजय वर्मा (Vijay Varma) बद्दल एक वक्तव्य केलंय. 'दहाड' वेबसिरीजमधील विजयची भूमिका पाहून त्यांना इर्षा वाटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

असा कोणता सिनेमा किंवा शो आहे जो पाहून तुम्हाला इर्षा वाटली तेव्हा मनोज वायपेयी म्हणाले, 'मला वाटतं दहाड सिरीजमध्ये विजय वर्माची भूमिका. ती भूमिका बघताच मला वाटलं होतं की हे कॅरेक्टर मला मिळायलं पाहिजे होतं. आता विजयने जर हे ऐकलं तर तो म्हणले काय सर तुम्ही तर किती काम करता.'

मनोज वायपेयी यांनी 'जंजीर' मधील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेविषयीही सांगितलं. 'जंजीर' सिनेमा पाहून मनोज वाजपेयी यांच्या अभिनेता होण्याच्या स्वप्नाला आणखी बळ मिळालं. ते म्हणाले, 'काय फिल्म आहे. दुसऱ्या कोणत्याच फिल्ममुळे इतका प्रभावित झालो नव्हतो.'

'दहाड' या सिरीजमधून सोनाक्षी सिन्हाने ओटीटीवर पदार्पण केले होते. १२ मे रोजी सिरीज प्रदर्शित झाली होती. यामध्ये विजय वर्माला व्हिलनच्या रोलमध्ये खूप पसंत केले गेले. 'मिर्झापूर' ते 'दहाड' आणि फिल्म 'डार्लिंग्स' मधील निगेटिव्ह रोलमुळे सध्या विजय लोकप्रिय होत आहे. त्याची भूमिका रिअल लाइफ सीरिअल  किलर मोहन कुमार वरुन प्रेरित आहे. ज्याला सायनाइड मोहन नावाने ओळखलं जातं.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: manoj bajpayee jealous with vijay varma for his role in dahad web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.