'हर हर महादेव' शिवभक्तीत तल्लीन मनोज वाजपेयी; उज्जैनच्या महाकालेश्वराचं घेतलं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:23 AM2024-05-22T11:23:14+5:302024-05-22T11:26:11+5:30
मनोज वाजपेयी हे कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असतात.
हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार शंकराचे भक्त आहेत. उज्जैन (Ujjain) येथील महाकालेश्वर (Mahakaleshwar) मंदिरात अनेक बॉलिवूडसेलिब्रिटी आणि दर्शनासाठी जात असतात. अभिनेते मनोज वाजपेयीदेखील शिवभक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून आलं. मनोज वाजपेयी यांनी महाकाल देवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी भगवान महाकालचे आशीर्वाद घेतले आणि भस्म आरतीमध्येही ते सहभागी झाले.
मनोज वाजपेयी यांनी महाकालेश्वर मंदिरातील नंदी हॉलमध्ये बसून ओम नमः शिवायचा जप केला. यासोबतच दर्शनानंतर त्यांनी सभा मंडपात पंडित आणि पुजारी यांच्यासोबत संवादही साधला. अभिनेता मनोज बाजपेयी यांचा 'भैय्याजी' हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होत आहे. याआधी त्यांनी भगवान महाकालचा आशीर्वाद घेतला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज यांनी महाकालाचे दर्शन घेऊन एक सुखद अनुभव आल्याचं सांगितलं.
मनोज वाजपेयी हे कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असतात. अनेक हीट सिनेमा आणि सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत मनोज वाजपेयी यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. विशेष म्हणजे 'भैय्याजी' हा मनोज वाजपेयींच्या कारकीर्दीतला १०० वा सिनेमा आहे. भैय्याजी' सिनेमा २४ मे २०२४ ला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सर्वांना वाजपेयींचा हा १०० वा सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे. 'भैय्याजी' सिनेमाशिवाय मनोज हे 'फॅमिली मॅन 3'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.. 'फॅमिली मॅन 3' च्या शूटींगला सुरुवात झाली आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महाकालेश्वर आहे. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर हे ज्योतिर्लिंग पांडवांनी बांधले होते. मध्य प्रदेशामधील उज्जैन येथे महाकालाचे मंदिर आहे. दु:ख आणि संकटांवर विजय मिळवणाऱ्या भगवान शंकराचे भक्त जगभरातून येथे येतात. जान्हवी कपूर, सारा अलू खान, विराट कोहली, अनुष्का शर्मा यांनी देखील याआधी महाकाल देवाचं दर्शन घेतलं आहे. तसेच परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी देखील उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन घेतलं.