Manoj Bajpayee : "मला पैशांची गरज, प्लीज..."; मनोज वाजपेयीनं जेव्हा छोट्याशा भूमिकेसाठी केलेली गयावया अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 08:00 AM2023-01-17T08:00:00+5:302023-01-17T08:00:02+5:30

Manoj Bajpayee : अलीकडे मनोज वाजपेयीने या स्ट्रगल काळाबद्दल सांगितलं. राम गोपाल वर्मांकडे तो काम मागायला गेला तेव्हाची एक आठवण त्याने शेअर केली...

Manoj Bajpayee Recalls Asking Ram Gopal Varma For A Small Role Said Mujhe Paise Ki Zarurat Hai | Manoj Bajpayee : "मला पैशांची गरज, प्लीज..."; मनोज वाजपेयीनं जेव्हा छोट्याशा भूमिकेसाठी केलेली गयावया अन्...

Manoj Bajpayee : "मला पैशांची गरज, प्लीज..."; मनोज वाजपेयीनं जेव्हा छोट्याशा भूमिकेसाठी केलेली गयावया अन्...

googlenewsNext

1990 नंतर बॉलिवूड रोमॅन्टिक सिनेमात रमलं असताना, बॉलिवूडमध्ये आमिर, शाहरूख, सलमानची चलती असताना ‘बँडीट क्वीन’ हा सिनेमा आला. या चित्रपटानं बॉलिवूडच्या रोमँटिसीझमच्या कल्पना मोडीत काढल्या. याच चित्रपटातलाच एक चेहरा होता मनोज वाजपेयीचा (Manoj Bajpayee). सिनेमा संपला आणि मनोज वाजपेयीला अनेक महिने कामचं मिळेना. योगायोगानं तो राम गोपाल वर्मांना भेटला आणि रामूला त्याचा ‘भिकू म्हात्रे’ भेटला. ‘सत्या’ (Satya ) या चित्रपटातत मनोज वाजपेयीनं साकारलेली ‘भिकू म्हात्रे’ची भूमिका इतकी अपार गाजली की आजही ‘भिकू म्हात्रे’ म्हटलं की मनोज वाजपेयीचा चेहरा चटकन डोळ्यांपुढे येतो. यानंतर मनोज वाजपेयीनं कधीच मागे वळून पाहिलं नाही, पण त्याआधीचा स्ट्रगल जीवघेणा होता. अलीकडे एका मुलाखतीत मनोज वाजपेयीने या स्ट्रगल काळाबद्दल सांगितलं.  राम गोपाल वर्मांकडे तो काम मागायला गेला तेव्हाची एक आठवण त्याने शेअर केली.

तो म्हणाला,''मी मुंबईत रहात होतो. पण मराठी भाषेचा लहेजा फारसा मला येत नव्हता. मी हिंदी-हिंदी भोजपूरी भाषा बोलणारा माणूस होतो. टीममध्ये नेटप्रॅक्टिससाठी बॅट्समन,बॉलर घेऊन जातात ना..तसंच माझं होतं. मी फक्त असंच सिनेमात काम मिळतंय का ते पहायला गेलो होतो. दौड या सिनेमात  ३-४ छोट्या भूमिका होत्या. त्याचा लेखक कनन अय्यर होता. त्यांनी सांगितलं की काही छोटे रोल आहेत त्यासाठी येऊन बघ. करणला मी 'बॅंडिड क्वीन' सिनेमापासून ओळखत होतो. त्याने सांगितल्यानुसार मी तिथे पोहोचलो.

तिथे पोहोचल्यावर दिग्दर्शकाच्या खूर्चीत बसलेल्या राम गोपाल वर्मांनी मला अचानक प्रश्न केला. 'तू याआधी काय काम केलं आहेस असं त्यांनी मला विचारलं. मी 'स्वाभिमान' असं उत्तर दिलं. त्यावर, 'कोणता सिनेमा केला आहेस का?',असा प्रश्न त्यांनी मला केला. मी म्हटलं-बॅंडिड क्वीन. बॅंडिड क्वीन म्हणताच त्यांचा चेहरा खुलला. बॅंडिड क्वीन माझा फेव्हरेट सिनेमा आहे. त्यात तुझी भूमिका काय होती? असं त्यांनी मला विचारलं. मी म्हटलं...मी सांगितलं तरी तुम्ही ओळखू शकणार नाही...सायलेंट रोल होता. त्यांनी पुन्हा विचारलं, कोणता रोल होता? मी पुन्हा म्हटलं, सायलेंट रोल होता. सांग तरी कुठला रोल होता? असं त्यांनी मला पुन्हा विचारलं. यावर मान सिंग..असं मी म्हणालो आणि रामगोपाल वर्मा थेट आपल्या बसल्या जागेवर ताडकन उठून उभे राहिले. तुला तर मी चार वर्षांपासून शोधत होतो.., असं ते म्हणाले. इतकंच नाही, एक काम कर,तू  दौड  सिनेमाला सोड..माझ्याकडे तुझ्यासाठी एक सिनेमा आहे. आणि यात तू लीड व्यक्तिरेखा साकारणार आहेस, असं  ते मला म्हणाले.  

तेव्हा मी अगदी गयावया करत म्हणालो, सर मला करु देत हा सिनेमा. कारण मला पैशाची नितांत गरज आहे. यावर, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला काम देणार, तुझ्यासोबत सिनेमा बनवणार, असं रामगोपाल म्हणाले.
त्यांनी मला ती भूमिका द्यायचं निश्चित केलं आणि ३० हजार रुपये देण्याचं कबूल केलं. माझ्यासाठी ३० हजार म्हणजे पूर्ण वर्षाचं भाडं होतं. इथूनच 'सत्या'चा प्रवास सुरू झाला...

Web Title: Manoj Bajpayee Recalls Asking Ram Gopal Varma For A Small Role Said Mujhe Paise Ki Zarurat Hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.