Manoj Bajpayee : "पूर्ण अंग्रेज..." मनोज वाजपेयींच्या मुलीला हिंदीच येत नाही; म्हणाले, 'लाज वाटते..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 09:31 AM2023-05-29T09:31:18+5:302023-05-29T09:32:01+5:30
मनोज वाजपेयींचा 'सिर्फ एक बंदा है' नुकताच रिलीज झाला आहे.
मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभाशाली अभिनेते आहेत. जेव्हा ते मोठ्या पडद्यावर येतात तेव्हा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात. सध्या ते 'सिर्फ एक बंदा है' सिनेमामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या कामाचं कौतुक होतंय. मनोज वाजपेयी यांची हिंदी भाषेवरही पकड आहे मात्र त्यांची मुलगी पूर्ण 'अंग्रेज' बनली असल्याचं त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
मनोज वाजपेयी एका मुलाखतीत म्हणाले, "माझी मुलगी पूर्ण अंग्रेज आहे. तिला कितीदा रागवलो, ओरडलो तरी ती हिंदी बोलत नाही. तिचे शिक्षकही आता निराश झाले आहेत. माझं काम, चित्रपट बघून तरी ती हिंदी शिकेल असं त्यांना वाटलं होतं. मात्र तिला माझे सिनेमे बघायला आवडत नाही. एकदा मी तिला बागी २ च्या सेटवर घेऊन गेलो. तिथे तिचे सर्वांनी लाड केले. तिने एकदा अॅक्शनही म्हटले. नंतर मी माझ्या व्हॅनमध्ये आली आणि म्हणाली टायगर कुठे आहे. हिंदी तर शिकत नाही पण हिंदी फिल्म्सचे हिरो तिच्या आवडीचे आहेत."
ते पुढे म्हणाले, "तिला शिक्षकांकडूनही खूप ओरडा बसला आहे. एकदा तिला तिच्या टीचरने तिला विचारलं आपके पापा का नाम क्या है? तर ती म्हणते, मेरा पापा..." मला तर लाजच वाटली.
मनोज वाजपेयींचा 'सिर्फ एक बंदा है' नुकताच रिलीज झाला आहे. तर लवकरच त्यांची लोकप्रिय वेब सिरीज 'फॅमिली मॅन 3' रिलीज होणार आहे. चाहत्यांमध्ये सिरीजची प्रचंड उत्सुकता आहे.