मनोज वायपेयी सोडणार होता मुंबई; पण महेश भट यांचा एक सल्ला आणि उजळलं नशिब
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 12:18 PM2024-02-20T12:18:28+5:302024-02-20T12:27:21+5:30
बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयी कायम त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात.
बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) कायम त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. आतापर्यंत अनेक दमदार भूमिकांना न्याय देत चाहत्यांचं त्यांनी मनोरंजन केलं. आज चित्रपटसृष्टीत त्यांनी नाव कमावलं असलं तरी त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक चढउतार त्याला आयुष्यात बघावे लागले आहेत. एक वेळ अशी आली होती की काम मिळत नसल्याने त्यांनी मुंबई सोडण्याचा विचार केला होता. याबद्दल खुद्द मनोज वाजपेयी यांनीच एका मुलाखतीत सांगितलं.
मनोज वाजपेयी सध्या "किलर सुप' या वेबसीरीजमुळे प्रचंड चर्चेत आहेत. ही वेबसीरीज 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. सध्या या वेबसीरीजमधील प्रमोशनसाठी ते विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतंच अभिनेता मनोज वाजपेयी यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, '१९९५च्या काळामध्ये मी काम शोधात होतो. त्यावेळी अनेक ठिकाणी काम करून सुद्धा माझ्या हातात काम नव्हते आणि फारसे पैसे सुद्धा नव्हते'.
पुढे ते म्हणाले, 'त्याचवेळी मला 'स्वाभिमान' मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसकडून मालिकेसाठी फोन आला होता. पण मला टेलिव्हिजन सिरीयल्समध्ये काम करायचे नव्हते. मालिकांमध्ये काम केलं तर मी चांगला अभिनेता होऊ शकणार नाही असं वाटायचं. अखेर मग मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. पण, महेश भट्ट यांच्याशी माझी भेट झाली आणि त्यांनी मला मुंबई शहर सोडून न जाण्याचा सल्ला दिला. सर्व स्वप्न याच शहरामध्ये पुर्ण होतील. तुझ्यामध्ये मला भावी नसीरूद्दीन शाह यांचा चेहरा दिसतोय, असे ते म्हणाले. त्यानंतर मग माझ्या एका मित्राच्या आग्रहानंतर मी मालिकेमध्ये काम करण्यासाठी होकार दर्शवला. तो निर्णय माझा अगदी योग्य होता'.
मनोज वाजपेयी कायम स्वतःच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. ‘सिर्फ एक बंदा काफी है’ सिनेमाला प्रेक्षकांना पसंती दर्शवली. मनोज वाजपेयी यांनी ‘द फॅमिली मॅन’, ‘सत्या’, ‘गुलमोहर’, ‘जोराम’, ‘शुटआऊट एट वडाला’, ‘स्पेशल 26’, यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.सोशल मीडियावर देखील मनोज वाजपेयी कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.