मनोज वाजपेयींनी विकलं मुंबईतील आलिशान घर, जाणून घ्या किती किंमत मिळाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 02:50 PM2024-08-22T14:50:49+5:302024-08-22T14:52:21+5:30

बिहारमधून आलेल्या मनोज यांनी मुंबईत संघर्ष करुन यशाचं शिखर गाठलं.

Manoj Bajpayee Sells His Luxurious Mumbai’s Mahalaxmi area apartment for Rs 9 crore | मनोज वाजपेयींनी विकलं मुंबईतील आलिशान घर, जाणून घ्या किती किंमत मिळाली?

मनोज वाजपेयींनी विकलं मुंबईतील आलिशान घर, जाणून घ्या किती किंमत मिळाली?

Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहेत. आपल्या जबरदस्त अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. बॉलिवूडसह (Bollywood) ओटीटी विश्वातदेखील त्याला बोलबाला पाहायला मिळत आहे. बिहारमधून आलेल्या मनोज यांनी मुंबईत संघर्ष करुन यशाचं शिखर गाठलं. आपल्या कारकिर्दित मनोज यांनी प्रसिद्धी सोबतच बक्कळ पैसाही कमावला आहे. 

 मनोज यांच्याकडे मुंबईत अनेक मालमत्ता आहेत. यापैकी एक म्हणजे 2013 मध्ये त्यांनी पत्नी शबानासोबत विकत घेतलेलं घर. हे आलिशान घर त्यांनी 9 कोटी रुपयांना विकल्याचं समोर आलं आहे. 2013 मध्ये हे अपार्टमेंट त्यांनी 6.4 कोटींना खरेदी केलं होतं. आता 11 वर्षांनंतर 9 कोटी रुपयांना विकून अभिनेत्याने 2.6 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. 


मनोज बाजपेयी यांचे हे घर मुंबईतील Minerva येथे आहे. महालक्ष्मी टॉवरमध्ये (apartment in Mumbai’s Mahalaxmi) असलेल्या या अपार्टमेंटचे कार्पेट एरिया 1247 स्क्वेअर फूट एवढा आहे. याशिवाय 240 स्क्वेअर फूट परिसरात कारसाठी दोन पार्किंग स्पेसही आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी मनोज यांनी मुंबईतील ओशिवरामध्ये ऑफिस खरेदी केलं होतं. या ऑफिसची किंमत तब्बल ३१.०८ कोटी इतकी आहे. त्याच बिल्डींगमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची ऑफिसं देखील आहेत. 


मनोज यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नुकतंच त्यांच्या  'गुलमोहर' चित्रपटाने ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बाजी मारली.  'गुलमोहर'ने सर्वोत्कृष्ट चित्रपट (हिंदी), सर्वोत्कृष्ट संवाद आणि मनोज वाजपेयी यांच्या अभिनयासाठी विशेष उल्लेख पुरस्कार पटकावला आहे.तर मनोज हे 'फॅमिली मॅन 3'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'फॅमिली मॅन 3' च्या शूटींगला सुरुवात झाली आहे. या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी यांच्यासह प्रियामणी, शरद केळकर, शारिब हाश्मी हे कलाकारही आहेत.

Web Title: Manoj Bajpayee Sells His Luxurious Mumbai’s Mahalaxmi area apartment for Rs 9 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.