नेहमी तुझा ऋणी राहीन, आईच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप सावरला नाही मनोज वाजपेयी, लिहिली भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 03:57 PM2022-12-13T15:57:48+5:302022-12-13T16:02:30+5:30

मनोज वाजपेयी आपल्या आईला 'आयर्न लेडी' म्हणायचा. तिच्याशिवाय सर्व काही अपूर्ण असल्याचे मनोजने सांगितले.

Manoj Bajpayee shared an emotional note on instagram after the death of his mother Geeta devi | नेहमी तुझा ऋणी राहीन, आईच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप सावरला नाही मनोज वाजपेयी, लिहिली भावुक पोस्ट

नेहमी तुझा ऋणी राहीन, आईच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप सावरला नाही मनोज वाजपेयी, लिहिली भावुक पोस्ट

googlenewsNext

Manoj Bajpayee Emotional Note for His Mother: अभिनेता मनोज बाजपेयीच्या आई गीता देवी यांचं 8 डिसेंबर रोजी दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. आईच्या निधनामुळे अभिनेता मनाने खचला  आहे. या कठीण काळात अभिनेता आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे.अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आईला श्रद्धांजली देण्यासाठी एक लांबलचक नोट शेअर केली आहे.  मनोजने आईला 'आयर्न लेडी' म्हणत त्यांचा सन्मान केला. त्याच्याशिवाय सर्व काही अपूर्ण असल्याचे मनोजने सांगितले. मनोज बायपेयी आपल्या आईला आपलं सर्वस्व मानत होता. 

मनोज बाजपेयी लिहितो, “आयर्न लेडीला श्रद्धांजली, माझी आई! मी तिला याच नावाने हाक मारायचो! सहा मुलांची आई आणि अत्यंत सज्जन शेतकऱ्याची पत्नी! तिनं आपल्या कुटुंबाचे नेहमीच संरक्षण केलं. या अक्षम्य जगाचा आणि तिच्या स्वप्नांचा त्याग करून, तिने प्रत्येक मुलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या पतीला आधार दिला. ती एक स्त्री होती जिने आपल्या निर्विवाद नजरेने जगावर राज्य केले!

 

मनोजने पुढे लिहिले आहे की, आईने आयुष्यात दिलेल्या असंख्य योगदानाबद्दल तो नेहमीच ऋणी राहीन. मनोजने लिहिले, "तिचे निःस्वार्थ प्रेम आणि समर्पण अतुलनीय होते. माझ्या संघर्षाच्या दिवसांमध्ये तिच्या पाठिंब्यामुळे मला बळ मिळालं.  तिचे प्रोत्साहनाचे शब्द नेहमीच माझ्यासोबत असतील आणि मी ते माझ्या मुलांना देईन. मी तिचेचं प्रतिबिंब आहे.
 

Web Title: Manoj Bajpayee shared an emotional note on instagram after the death of his mother Geeta devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.