रणबीर कपूर, भन्साळींपाठोपाठ अभिनेता मनोज वाजपेयीला कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 03:04 PM2021-03-12T15:04:20+5:302021-03-12T15:05:05+5:30

कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर मनोज वाजपेयीच्या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे.

manoj bajpayee tested covid 19 positive during dispatch movie shooting | रणबीर कपूर, भन्साळींपाठोपाठ अभिनेता मनोज वाजपेयीला कोरोनाची लागण

रणबीर कपूर, भन्साळींपाठोपाठ अभिनेता मनोज वाजपेयीला कोरोनाची लागण

googlenewsNext
ठळक मुद्देमनोज सध्या ‘डिस्पॅच्ड’ या सिनेमात बिझी आहे. त्याचा हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.

अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यालाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या मनोज वाजपेयी घरीच क्वारंटाईन असल्याचे कळतेय. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर मनोज वाजपेयीच्या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मनोज वाजपेयीच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला.

टीमने एक स्टेटमेंट जारी केले आहे. यात म्हटल्यानुसार, दिग्दर्शकाला कोरोना झाल्यानंतर मनोज वाजपेयीनेही कोव्हिड 19 टेस्ट केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. यानंतर सिनेमाचे शूटींग काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तूर्तास मनोज वाजपेयीची प्रकृती स्थिर आहे आणि तो घरीच क्वारंटाईन असून विश्रांती घेतोय.

मनोज सध्या ‘डिस्पॅच्ड’ या सिनेमात बिझी आहे. त्याचा हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. मनोजची ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजचा दुसरा सीझनही लवकरच प्रेक्षकांचा भेटीस येणार आहे. हा दुसरा सीझन आधी 12 फेबु्रवारीला रिलीज होणार होता. मात्र ‘तांडव’ या वेबसीरिजवरील वादानंतर ‘द फॅमिली मॅन 2’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 26 मार्चला ‘सायलन्स- कॅन यू हिअर इट’ या सिनेमातही मनोज दिसणार आहे. त्याचा हा सिनेमाही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
मनोज वाजपेयीआधी अलीकडे रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हेही कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.

Web Title: manoj bajpayee tested covid 19 positive during dispatch movie shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.