'मी एका कोपऱ्यात बसून होतो'; नाईट क्लबमध्ये स्लिपर घालून गेलेल्या मनोज वाजपेयीची struggle story

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 06:00 PM2023-02-28T18:00:18+5:302023-02-28T18:02:05+5:30

Manoj bajpayee: प्रसिद्ध मिळण्यापूर्वी मनोज वाजपेयीने प्रचंड हालाखीचं आयुष्य जगलं आहे.  इतकंच नाही तर अभिनेता शाहरुख खानसोबत (shah rukh khan) नाईट क्लबमध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे चांगले शूजदेखील नव्हते.

manoj bajpayee told that shah rukh khan took him to a disco for the first time | 'मी एका कोपऱ्यात बसून होतो'; नाईट क्लबमध्ये स्लिपर घालून गेलेल्या मनोज वाजपेयीची struggle story

'मी एका कोपऱ्यात बसून होतो'; नाईट क्लबमध्ये स्लिपर घालून गेलेल्या मनोज वाजपेयीची struggle story

googlenewsNext

कलाविश्वातील गुणी आणि तितक्याच ताकदीने कोणतीही भूमिका सहजपणे पार पाडणारा अभिनेता म्हणजे मनोज वाजपेयी (manoj bajpayee) . रुपेरी पडद्यासह मनोज वाजपेयीने ओटीटीवरही आपल्या अभिनयाचा डंका वाजवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच त्याचा 'गुलमोहर' हा आगामी चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचं मनोज जोरदार प्रमोशन करत असून अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मनोज वाजपेयीने त्याच्या स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला आहे.

मूळ बिहारचा असलेला मनोज वाजपेयीने नाटकांपासून त्याच्या करिअरची सुरुवात केली. दिल्लीत शिक्षण घेत असताना त्याने अनेक नाटकांमध्ये काम केलं. परंतु, राम गोपाल वर्मा (ram gopal varma) यांच्या 'सत्या' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या चित्रपटात भिकू म्हात्रे ही भूमिका करुन तो रातोरात सुपरस्टार झाला. मात्र, प्रसिद्ध मिळण्यापूर्वी मनोज वाजपेयीने प्रचंड हालाखीचं आयुष्य जगलं आहे.  इतकंच नाही तर अभिनेता शाहरुख खानसोबत (shah rukh khan) नाईट क्लबमध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे चांगले शूजदेखील नव्हते. त्यामुळे तो चक्क स्लिपर घालून नाईट क्लबमध्ये पोहोचल्याचं त्याने सांगितलं.

'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत मनोजने त्याच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला. "ही खरं खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी दिल्लीमध्ये घुंघरु नावाचा एक नाईट क्लब होता. आणि, या क्लबमध्ये मी चक्क चप्पल घालून गेलो होतो. त्यावेळी त्या लोकांमध्ये सगळ्यात गरीब व्यक्ती मीच होतो. माझ्या पायातली चप्पल पाहून कसंबसं करुन आम्ही शूजची व्यवस्था केली आणि मग मी त्या क्लबमध्ये प्रवेश केला," असं मनोज वाजपेयी म्हणाला.

पुढे तो म्हणतो, आयुष्यात पहिल्यांदा मी नाईट क्लब म्हणजे काय असतं हे पाहिलं. त्यावेळी सगळे जण डान्स करत होते. पण, मी एका कोपऱ्यात वाईन घेऊन बसलो होतो.

दरम्यान, मनोज वाजपेयी लोकप्रिय अभिनेता असून त्याच्या अभिनयकौशल्याचं कायमच कौतुक केलं जातं.  'द फॅमिली मॅन'मध्ये त्याने साकारलेली भूमिका तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतली होती. या  सीरिजमध्ये त्याने श्रीकांत तिवारी ही भूमिका साकारली होती.

Web Title: manoj bajpayee told that shah rukh khan took him to a disco for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.