शबाना रजाची अशी झाली नेहा वाजपेयी..., एकेकाळी प्रसिद्ध असलेली मनोज वाजपेयीची पत्नी लाइमलाईटपासून राहते दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 08:00 AM2023-04-18T08:00:00+5:302023-04-18T08:00:02+5:30

चित्रपटात येण्यापूर्वी  नेहाला लोक शबाना रजा नावाने ओळखत होते, पण...

Manoj bajpayee wife neha aka shabana razas bobby deol ajay devgn actress | शबाना रजाची अशी झाली नेहा वाजपेयी..., एकेकाळी प्रसिद्ध असलेली मनोज वाजपेयीची पत्नी लाइमलाईटपासून राहते दूर

शबाना रजाची अशी झाली नेहा वाजपेयी..., एकेकाळी प्रसिद्ध असलेली मनोज वाजपेयीची पत्नी लाइमलाईटपासून राहते दूर

googlenewsNext

अभिनेता मनोज वाजपेयीची (Manoj Bajpayee) वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. मोठा पडदा असो किंवा ओटीटी माध्यम मनोज वाजपेयीच्या अभिनयाची जादू सगळीकडेच पसरली आहे. फॅमिली मॅन सिरीजमुळे मनोजला आणखी लोकप्रियता मिळाली. मनोज खऱ्या आयुष्यातही फॅमिली मॅन आहे. अभिनेत्री शबाना रजासोबत (Shabana Raza) मनोजने लग्न केलं आहे. आज शबानाचा वाढदिवस आहे. 

शबानाच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1998 मध्ये 'करीब' या सिनेमातून झाली. हा विधू विनोद चोप्राचा चित्रपट होता. या चित्रपटात ती बॉबी देओलसोबत झळकली होती. 'करीब'शिवाय ती अजय देवगणसोबत 'होगी प्यार की जीत'मध्येही दिसली आहे. याशिवाय तिने 'कोई मेरे दिल में है', 'ऍसिड फॅक्टरी'मध्येही काम केले आहे.

चित्रपटात येण्यापूर्वी  नेहाला लोक शबाना रजा नावाने ओळखत होते. पण जेव्हा तिला करीब चित्रपटातून डेब्यू करण्याची संधी मिळाली तेव्हा विधू विनोद चोप्रानेच तिचे नाव शबाना वरून बदलून नेहा केले. तेव्हापासून लोक तिला नेहा म्हणून ओळखतात. 

 मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघींची भेट 'करीब' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. यानंतर त्यांचे प्रेम फुलले आणि दोघांनी लग्न केले. लग्नापूर्वी सुमारे सात वर्षे नेहा व मनोज रिलेशनशिपमध्ये होते. नेहा आणि मनोजला एक मुलगी आहे तिचं नाव नैला आहे. लग्नानंतर नेहा चित्रपटांपासून दूर आहे. तिचा लुकही आता पूर्णपणे बदलला आहे. गुलमोहरच्या स्क्रिनिंगला नेहा पती मनोज वाजपेयी सोबत दिसली होती.

नेहा शेवटची २००९ मध्ये आलेल्या अॅसिडी फॅक्टरी सिनेमात दिसली होती. आता ती ग्लॅमरच्या झगमगत्यापासून दूर मॅरिड लाईफ एन्जॉय करते आहे. 
 

Web Title: Manoj bajpayee wife neha aka shabana razas bobby deol ajay devgn actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.