Manoj Joshi : "मी कोमात होतो, दृष्टी गेली होती..."; मनोज जोशींनी सांगितला 'तो' वेदनादायी अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 01:03 PM2023-09-21T13:03:40+5:302023-09-21T13:23:20+5:30

Manoj Joshi : मनोज जोशी यांनी सांगितले की, 'देवदास' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचा दुसरा जन्म झाला.

Manoj Joshi reveals he suffered brain stroke and slipped into coma | Manoj Joshi : "मी कोमात होतो, दृष्टी गेली होती..."; मनोज जोशींनी सांगितला 'तो' वेदनादायी अनुभव

Manoj Joshi : "मी कोमात होतो, दृष्टी गेली होती..."; मनोज जोशींनी सांगितला 'तो' वेदनादायी अनुभव

googlenewsNext

मनोज जोशी बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर आपली छाप सोडली आहे. गंभीर व्यक्तिरेखा असो की विनोदी, प्रत्येक भूमिकेला न्याय देऊन त्यांनी अनेकांची वाहवा मिळवली आहे. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेला एक खुलासा ऐकून चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल. मनोज जोशी यांनी सांगितले की, 'देवदास' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचा दुसरा जन्म झाला.

एका लोकप्रिय यूट्यूब चॅनलशी संवाद साधताना मनोज जोशी म्हणाले, "2001 मध्ये मी आजारी पडलो. मला ब्रेन स्ट्रोक आला. मी दीड वर्ष हॉस्पिटलच्या बेडवर पडून राहिलो. 'देवदास'च्या शूटिंगदरम्यान आजारी पडलो. मी चार दिवस कोमात होतो. माझी दृष्टी गेली होती. 19 दिवस मला काहीच दिसत नव्हतं. हा माझा पुनर्जन्म आहे. त्यावेळी मला दुसरा जन्म मिळाला."

"टीव्ही शोमुळे माझी लोकप्रियता खूप वाढली आणि त्यानंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. 'हंगामा' आणि 'हलचल'पासून मी दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत 12 चित्रपट केले." अलीकडेच जोशी आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसले होते. यामध्ये त्यांनी अनन्या पांडेचे वडील जयपाल श्रीवास्तव यांची भूमिका साकारली आहे. 

"बँक बॅलन्स शून्य झालं होतं"

"माझी सेविंग संपली होती. काहीच उरलं नव्हतं. त्यावेळी माझी पत्नी मला आधार देण्यासाठी ट्यूशन घेऊन शिकवू लागली. त्या काळात एका टीव्ही शोने मला चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्यास मदत केली, ज्याचे नाव होते 'कहता है दिल', ज्यामध्ये मी खलनायकाची भूमिका केली होती. मी या शोमध्ये फक्त 4 दिवस काम करणार होतो, पण मग मी त्यांच्या मुख्य कलाकारांपैकी एक झालो" असं जोशी यांनी म्हटलं आहे. 

जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम

'फिर हेरा फेरी', 'चुप चुप के' आणि 'खट्टा मीठा' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकणाऱ्या मनोज यांनी अनेक टीव्ही शो आणि थिएटरमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मनोज यांनी आपल्या करिअरची सुरुवात हिंदी आणि गुजराती थिएटरमधून केली. 1999 मध्ये 'सरफरोश' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Manoj Joshi reveals he suffered brain stroke and slipped into coma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.