पहिल्याच सिनेमात श्रीदेवीचा हिरो बनला या सुपरस्टारचा मुलगा, पण एका हिटच्या प्रतीक्षेत संपले करिअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 11:09 AM2020-07-24T11:09:06+5:302020-07-24T11:10:14+5:30

बॉलिवूडमध्ये असे अनेकजण आहेत, ज्यांना आपल्या आईवडिलांच्या पुण्याईने चित्रपट तर मिळालेत, पण याऊपरही त्यांना आपली ओळख निर्माण करता आली नाही.

manoj kumar son kunal goswami life interesting facts | पहिल्याच सिनेमात श्रीदेवीचा हिरो बनला या सुपरस्टारचा मुलगा, पण एका हिटच्या प्रतीक्षेत संपले करिअर!

पहिल्याच सिनेमात श्रीदेवीचा हिरो बनला या सुपरस्टारचा मुलगा, पण एका हिटच्या प्रतीक्षेत संपले करिअर!

googlenewsNext
ठळक मुद्दे१९९३ मध्ये ‘कलाकार’ या चित्रपटातून श्रीदेवीचा हिरो बनून कुणालने डेब्यू केला.

बॉलिवूडमध्ये देशभक्तिपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार यांचा आज वाढदिवस. बॉलिवूडमध्ये त्यांना ‘भारत’ नावानेही ओळखले जाते. मनोज कुमार यांचे खरे नाव हरीकिशन गिरी गोस्वामी आहे. मनोज कुमार यांनी एक काळ गाजवला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा कुणाल गोस्वामी हाही बॉलिवूडमध्ये आला. मात्र वडिलांसारखे यश त्याला कमावता आले नाही. मग काय इंडस्ट्रीत आला आणि आला तसा गायब झाला

  

कुणालने बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा बराच प्रयत्न केला.  मात्र त्याला ते जमले नाही ते नाहीच. पुढे ग्लॅमरच्या जगापासून तो असा काही दूर गेला की आज फार अनेक लोकांना त्याचे नावही स्मरणात नाही.

कुणालला अभिनयाचे बालकडू घरातच मिळाले. पित्याला अ‍ॅक्टिंग करताना पाहतच तो लहानाचा मोठा झाला. कदाचित याचमुळे मनोज कुमार यांनी आपल्या मुलाला अभिनेता बनवण्याचा विचार केला असावा. त्यामुळेच लहानपणापासून त्यांनी कुणालला अभिनयाचे धडे देणे सुरु केले.   इतकेच नाही तर आपल्या  क्रांति या चित्रपटात कुणालला बालकलाकार म्हणून कॅमे-यापुढे उभे केले. 

पुढे कुणालनेही याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. वडिलांनाही  त्याच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. आपला मुलगा आपले नाव मोठे करेल, कदाचित हे मनोज कुमार यांचे स्वप्न असावे. १९९३ मध्ये ‘कलाकार’ या चित्रपटातून श्रीदेवीचा हिरो बनून कुणालने डेब्यू केला. हा चित्रपट चालला नाही. पण यातील ‘नीले नीले अंबर पर’ या गाण्याने मात्र धूम केली. हे गाणे श्रीदेवी व कुणालवर चित्रीत केले गेले होते. यानंतर कुणाल आणखीही काही चित्रपट मिळाले. घुंघरू, दो गुलाब, पाप की कमाई यासारख्या चित्रपटांत त्याला संधी मिळाली. पण हे चित्रपट फ्लॉप झालेत. कुणालकडे ना पित्यासारखा चेहरा होता ना त्यांच्यासारखे अ‍ॅक्टिंग स्किल. फिल्मी करिअरमध्ये एका हिटसाठी कुणालने जंग जंग पछाडले. पण प्रेक्षकांनी त्याला स्वीकारले नाही. 

 काही चित्रपटानंतर कुणीच त्याला काम देईनासे झाले. पण एक पित्याचे हृदय स्वस्थ बसेना. त्यांनी पुन्हा एकदा कुणालसाठी चित्रपट काढला. १९९९ मध्ये ‘जय हिंद’ या चित्रपटातून त्यांनी कुणालला रिलॉन्च केले. या चित्रपटात ऋषी कपूर, शिल्पा शिरोडकर असे स्टार्स होते. पण हा चित्रपटही कुणालला तगवू शकला नाही.

याच काळात मनोज कुमार यांचे प्रॉडक्शन हाऊसही बंद झाले आणि कुणालचे करिअरही.अखेर कुणालने इंडस्ट्रीतून बाहेर पडणेच योग्य समजले. ग्लॅमर इंडस्ट्रीतून बाहेर पडल्यानंतर त्याने कॅटरिंगचा बिझनेस उघडला आणि त्यातच रमला.

Web Title: manoj kumar son kunal goswami life interesting facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.