"औरंगजेबाची कबर हटवण्याची गरज नाही, कारण...", बॉलिवूडमधील लेखकाचा मोदी सरकारला वेगळाच सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:28 IST2025-03-11T13:28:12+5:302025-03-11T13:28:36+5:30
संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवरुन जो वाद सुरु आहे त्यावर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गाण्यांचा गीतकार मनोज मुंतशीर याने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

"औरंगजेबाची कबर हटवण्याची गरज नाही, कारण...", बॉलिवूडमधील लेखकाचा मोदी सरकारला वेगळाच सल्ला
'छावा' सिनेमानंतर छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद सुरू आहे. ही कबर हटवण्याची मागणी होत आहे. आता यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध लेखक आणि आदिपुरुषमुळे चर्चेत आलेला मनोज मुंतशिर याने मोठं वक्तव्य केलं आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याची गरज नाही. त्यावर शौचालय बांधा असं मनोज मुंतशिरने म्हटलं आहे.
मनोज मुंतशिरने त्याच्या X अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तो म्हणतो, "आज देशातून ही मागणी होत आहे की महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी. पण, मला वाटतं की ती हटवली नाही गेली पाहिजे. जेव्हा अयोध्येत प्रभू श्री रामाचं मंदिर बनत होतं तेव्हा काही लोक त्यांचं ज्ञान पाजळत होते की देव तर आपल्यात आहे. मग मंदिर बनवायची काय गरज? त्या जागेवर हॉस्पिटल, शाळा किंवा अनाथालय बांधा असं ते सांगत होते".
औरंगज़ेब की क़ब्र नहीं हटनी चाहिये, क्यूँ?
— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) March 10, 2025
मैं बताता हूँ!#Aurangzeb#ChhatrapatiShivajiMaharajJi#chhaava#ChhatrapatiSambhajiMaharaj#ManojMuntashir#ManojMuntashirShuklapic.twitter.com/gjBkchVABE
पुढे तो म्हणतो, "मलादेखील भारत सरकारला विनंती करायची आहे की औरंगजेबाची कबर हटवण्याची काहीच गरज नाही. त्यावर शौचालय बांधा. त्याच्यासाठी युरीया आणि मीठ आपण सनातनी दान म्हणून देऊच शकतो. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक म्हणतील की हिंदुस्तान कोणाच्या बापाचा नाहीये. त्यांना मी सांगू इच्छितो की नसानसांत सूर्यवंशी स्वाभिमान होता आणि आहे. सनातन धर्मामुळे आकाश भगवं होतं आणि आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांना आम्ही आमचे पिता मानतो. आमच्या बापाचा हिंदुस्थान होता आणि आहे".