Manoj Tiwari : वयाच्या ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा झाले मनोज तिवारी, म्हणाले- सरस्वतीनंतर घरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 04:34 PM2022-12-12T16:34:04+5:302022-12-12T17:42:16+5:30
Manoj Tiwari :वयाच्या 51 व्या वर्षी मनोज तिवारी पुन्हा एकदा बाबा झाले आहेत. खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर ही गुडन्यूज शेअर केली.
Manoj Tiwari Become father Again:भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार गायक, अभिनेता आणि भाजप खासदार मनोज तिवारी हे तिसऱ्यांदा बाबा झाले आहेत. त्यांची पत्नी सुरभी तिवारी हिने आज 12 डिसेंबर रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मनोज तिवारी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
मुलीला म्हटलं सरस्वती
मनोज तिवारीने पत्नीसोबतचा हॉस्पिटलमधील पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून बाबा झाल्याची बातमी दिली आहे. मुलीच्या आगमनाचा आनंद व्यक्त करत त्यांनी एक पोस्टही लिहिली आहे. वयाच्या ५१ व्या वर्षी मुलीचा बाप झाल्यामुळे ते भावूक झाले आणि त्यांनी लिहिले, "हे कळवताना अत्यंत आनंद होत आहे की लक्ष्मीनंतर माझ्या घरी सरस्वतीचे आगमन झाले आहे... आज घरात एका सुंदर मुलीचा जन्म झाला आहे. तुम्ही सर्वांनी त्याला आशीर्वाद द्या.. सुरभी-मनोज तिवारी"
मनोज तिवारी यांनी याआधी पत्नीचा डोहाळे जेवणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता. ‘काही गोष्टींचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. तो आनंद फक्त अनुभवावा लागतो,’असं त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं होतं.
सुरभी यांच्यासोबत मनोज तिवारींचं हे दुसरं लग्न आहे. 1999 मध्ये मनोज यांनी राणीशी लग्न केलं होतं. मात्र काही वर्षांआधी त्यांचा घटस्फोट झाला. त्या दोघांना रिती नावाची मुलगी आहे. 2020 मध्ये लॉकडाऊन काळात मनोज यांनी सुरभी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्या दोघांना सान्विका नावाची मुलगी झाली. आता मनोज तिसर्यांदा बाबा होणार आहेत.
मनोज तिवारी यांनी गेल्या काही वर्षात राजकारणात चांगलाच जम बसवला. मात्र त्यांची भोजपुरी सिनेमाचे सुपरस्टार म्हणून ते अधिक लोकप्रिय आहेत. गायन क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर 2004 साली त्यांनी ‘ससुरा बडा पईसावाला’ या भोजपुरी सिनेमातून डेब्यू केला. त्यांचा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. यानंतर त्यांनी भोजपुरी इंडस्ट्रीत अनेक हिट सिनेमे दिलेत. 2009 साली सपाच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढली. मात्र त्यांचा पराभव झाला. 2013 साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पूर्व दिल्लीतून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकलेही. त्यानंतर ते दिल्ली भाजपचे अध्यक्षही बनले.