Manoj Tiwari ने लपवून ठेवली होती दुस-या लग्नाची गोष्ट, आज सेलिब्रेट करतायेत लग्नाचा पहिला वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 07:28 PM2021-04-27T19:28:41+5:302021-04-27T19:34:34+5:30
फार काळ काही ते लपवून ठेवू शकले नाहीत. कारण दुसरी पत्नी सुरभीपासून त्यांना दुसरी मुलगी झाली. त्यावेळी त्यांचे लग्न जगा समोर आले होते.
पहिल्या पत्नीला दिलेल्या घटस्फोटानंतर 8 वर्षांनी मनोज तिवारींनी दुसरे लग्न करत आयुष्याला नव्याने सुरुवात केली. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच २७ एप्रिल 2020 मध्ये मनोज तिवारींनी सुरभी तिवारीशी लग्न केले. गुपचूप उरकलेल्या लग्नाचा काही महिने तरी कुठेच गाजावाजा करण्यात आला नव्हता.
दुस-या लग्नाची माहिती त्यांनी लपवून ठेवली होती. मात्र फार काळ काही ते लपवून ठेवू शकले नाहीत. कारण दुसरी पत्नी सुरभीपासून त्यांना दुसरी मुलगी झाली. त्यावेळी त्यांचे लग्न जगा समोर आले होते. सुरभी ही मनोज यांची सेक्रेटरी होती आणि ती एक चांगली गायिकाही आहे. मनोज तिवारींनी अखेर या लग्नाचा खुलासा केला होता त्यादरम्यान त्यांनी म्हटले होते की,मुलीच्या आग्रहाखातर लग्न करावे लागल्याचे त्यांनी सांगितले होते.
आज या लग्नाचा पहिला वाढदिवस कपल सेलिब्रेट करत आहेत. पत्नी सुरभीनेही खास अंदाजात पती मनोज तिवारीला शुभेच्छा दिल्या आहेत. नुसत्या शुभेच्छाच दिल्या नाहीतर अशीच साथ देत राहणार असल्याचे वचनही तिने दिले आहे.
2004 मध्ये मनोज तिवारी यांनी ‘ससुरा बड़ा पइसावाला’ हा भोजपुरी सिनेमा केला. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यानंतर त्यांनी अनेक हिट सिनेमे दिलेत. सिनेमात येण्यापूर्वीच म्हणजे 1999 मध्ये त्यांनी राणी तिवारीसोबत लग्न केले होते. त्यांना जिया नावाची एक मुलगीही आहे. मनोज यांनी 13 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला. मनोज आता 50 वर्षांचे आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री श्वेता तिवारीमुळे मनोज तिवारींची पहिली पत्नी नाराज होती. तिच्यामुळेच तिने मनोज यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बिग बॉस 4 मध्ये मनोज तिवारी व श्वेता तिवारी स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांच्यातील जवळीकीच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या.रिअल लाईफमध्येही मनोज व श्वेता चांगले मित्र आहेत.
दोघांनी एकत्र भोजपुरी सिनेमातही काम केले आहे. बिग बॉसच्या घरातील मनोज व श्वेता यांची जवळीक मनोज यांच्या पत्नी राणी यांना अजिबात आवडली नव्हती आणि म्हणून तिने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते