Manoj Bajpayee : सुशांतची 'ती' इच्छा पूर्ण करु शकलो नाही, मनोज वाजपेयींनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 16:39 IST2023-03-30T16:38:30+5:302023-03-30T16:39:36+5:30
सुशांत आणि मनोज वाजपेयी यांनी 2019 साली आलेल्या 'सोनचिरिया' सिनेमात काम केले होते.

Manoj Bajpayee : सुशांतची 'ती' इच्छा पूर्ण करु शकलो नाही, मनोज वाजपेयींनी व्यक्त केली खंत
अभिनेता सुशांतसिंग राजपूतने (Sushantsingh Rajput) १४ जून २०२० रोजी गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे मनोरंजनसृष्टी हादरली होती. आजही अनेक कलाकार सुशांतची आठवण काढत भावूक होतात. अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी नुकतीच एका मुलाखतीत सुशांतची एक आठवण सांगितली. तसंच त्याची 'ती' इच्छा अपूर्णच राहिली म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.
'द बॉम्बे जर्नी' या मुलाखतीत मनोज वाजपेयी यांनी सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते म्हणाले, 'सुशांत हा खरंच खूप चांगला मुलगा होता. मी त्याच्यासोबत बराच वेळ घालवला आहे. तो अनेक मुद्द्यांवर माझ्याशी चर्चा करायचा. कोरोनाआधी मी उत्तराखंडमध्ये एका सिनेमाचं शूट करत होतो. तेव्हा सुशांतने मला मेसेज केला की त्याला माझ्या घरी मटण खायला यायचे आहे. त्यावर मी त्याला नक्कीच खाऊया असं म्हटलं होतं. शूटवरुन परत आल्यानंतर मी त्याला माझ्या घरी बोलवेन असं ठरवलं होतं.'
ते पुढे म्हणाले, 'सुशांतच्या निधनाची बातमी वाचून विश्वासच बसला नाही. खूप वाईट वाटलं. त्याच्या मृत्यूनंतर २ महिने मी निराश होतो. त्याचं असं अकस्मात निधन हे केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नाही तर त्याला ओळखणाऱ्या सर्वांसाठीच धक्का होता.'
सुशांत आणि मनोज वाजपेयी यांनी 2019 साली आलेल्या 'सोनचिरिया' सिनेमात काम केले होते. तेव्हा दोघांची चांगली मैत्रीही झाली होती. मनोज वाजपेयी सेटवर घरुन मटण आणत असत. पण दुर्देवाने पुन्हा त्यांच्या घरी मटण खायची सुशांतची इच्छा अपूर्णच राहिली.