‘ते’ एक वाक्य आणि नात्याचा अंत...! सिमी ग्रेवाल व नवाब पतौडी यांची अशीही लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 06:59 PM2021-04-14T18:59:29+5:302021-04-14T19:00:21+5:30
Mansoor Ali Khan and Simi Garewal love story : डोअर बेल वाजली, सिमीने दरवाजा उघडला. दरवाज्यात मन्सूर पतौडी उभे होते. त्यांच्या चेह-यावर संकोच होता आणि मनात अनेक प्रश्न...
ज्या व्यक्तिसोबत सिमी ग्रेवाल (Simi Garewal) संसार थाटण्याचे स्वप्न रंगवत होती, तिच व्यक्ती एकदिवस आता इथून पुढे आपल्यातील नाते संपले, असे म्हणून सोडून निघून जाईल, असा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. पण झाले तसेच. मन्सूर अली खान पतौडीच्या (Mansoor Ali Khan Pataudi) आयुष्यात शर्मिला आली आणि तिच्यासाठी त्यांनी सिमीला सोडले.
शर्मिला आयुष्यात येण्यापूर्वी सिमी व मन्सूर यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. बॉलिवूडपासून क्रिकेट जगतापर्यंत या चर्चा सुरू होत्या. पतौडी व सिमी दोघांनाही पाश्चात्य संस्कृती आवडायची. हीच एक आवड दोघांमध्ये जवळीक निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. क्रिकेटच्या मैदानांपासून पब्लिक इव्हेंटमध्येही दोघेही सतत सोबत दिसत. (Mansoor Ali Khan Simi Garewal love story)
असे म्हणतात की, सिमी ग्रेवालबद्दल नवाब पतौडी चांगलेच गंभीर होते. या नात्याला ते एक नाव देऊ इच्छित होते. पण कदाचित नियतीने वेगळेच काही लिहून ठेवले होते. शर्मिला टागौरसोबत (Sharmila Tagore) नवाब पतौडींची ओळख झाली आणि इथून पुढे सगळेच बदलले. शर्मिलाला पाहताच, हीच ती आपल्यासाठी बनलेली मुलगी, असे नवाब पतौडी यांना वाटते आणि तिच्यासाठी त्यांनी सिमीला सोडले.
शर्मिला मोठी स्टार होती. तर मन्सूर पतौडी बॉलिवूडच्या झगमटापासून बरेच दूर होते. म्हणजेच फिल्मी दुनियेत त्यांना फार रस नव्हता. पण एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून नवाव पतौडी व शर्मिला भेटले आणि पहिल्याच भेटीत पतौडी शर्मिलावर भाळले. इतके की, एकेदिवशी थेट सिमीसोबत ब्रेकअप करण्याच्या इराद्याने तिच्या घरी पोहोचले.
डोअर बेल वाजली, सिमीने दरवाजा उघडला. दरवाज्यात मन्सूर पतौडी उभे होते. त्यांच्या चेह-यावर संकोच होता आणि मनात अनेक प्रश्न. सिमीने मन्सूर यांना निंबू शरबतासाठी विचारले. पण मन्सूर यांनी नकार दिला. मला माफ कर... पण आपल्यातील सर्व काही आता संपलेय. मला कुणी दुसरी भेटलीये, असे एक श्वासात त्यांनी सिमीला सांगून टाकले. सिमी क्षणभर गोंधळली. पण तिने स्वत:ला सांभाळले. इतक्यात मन्सूर पतौडी जाण्यासाठी उठून उभे झालेत. मन्सूर यांनी नकार देऊनही सिमी त्यांना सोडायला बाहेर आली. बाहेर बघते काय, तर ती कुणीतरी बाहेर उभी होती. ती कोण तर शर्मिला टागोर. दोघींचीही नजरानजर झाली आणि काही क्षण शांतता पसरली. यानंतर सिमी काहीही न बोलता तिथून निघून गेली. मन्सूर व शर्मिलाच्या आयुष्यातून ती शांतपणे बाहेर पडली.
मन्सूर पतौडी यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर काही काळानंतर सिमीच्या आयुष्यात रवि मोहनची एन्ट्री झाली. दोघांनीही लग्न केले. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोघांनी घटस्फोट घेतला.