वर्ल्ड टूरवर असलेल्या मानुषी शिल्लरने मासिक पाळीबद्दल केले मोठे वक्तव्य, वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 01:05 PM2018-02-07T13:05:25+5:302018-02-07T18:35:25+5:30
विश्वसुंदरीचा किताब आपल्या नावे करणाºया मानुषी छिल्लरने मासिक पाळीबद्दल एक मोठे विधान केले आहे. मानुषीच्या मते, समाजात बदल घडवून ...
व श्वसुंदरीचा किताब आपल्या नावे करणाºया मानुषी छिल्लरने मासिक पाळीबद्दल एक मोठे विधान केले आहे. मानुषीच्या मते, समाजात बदल घडवून आणण्यासाठी महिलांच्या या समस्येबद्दल चुकीचा विचार करणे सोडावे. सध्या मानुषी वर्ल्ड टूरवर असून, महिलांनी या दरम्यान स्वच्छतेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, याबाबतची जनजागृती करताना दिसत आहे. मानुषीने माध्यमांशी बोलताना म्हटले की, राजकीय पक्षांनीदेखील त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये याबाबतचा उल्लेख करणे गरजेचे आहे.
मानुषीने म्हटले की, विश्वसुंदरीचा किताब जिंकल्यानंतर जेव्हा मी हरियाणाला गेली होती, तेव्हा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी तरुणींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले होते. मात्र माझ्या मते ही प्रक्रिया तात्पुरती आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांनी स्वच्छतेबद्दल विशेष लक्ष द्यावे, या मुद्द्याचा मानुषीच्या सामाजिक कामात समावेश आहे. जेव्हा मानुषीने या स्पर्धेत सहभाग घेतला होता, तेव्हादेखील तिने याबाबतचा उल्लेख केला. आता ती या मुद्द्यावर आणखी प्रभावीपणे काम करताना दिसत आहे.
मानुषी सध्या तिच्या या अभियानासाठी वर्ल्ड टूरवर असून, ज्यामध्ये ती महिलांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करताना दिसत आहे. आपल्या या टूरच्या माध्यमातून मानुषी महिलांना ‘शर्म से आजादी’ असा संदेश देताना दिसत आहे. अभिनेता अक्षयकुमार याचा आगामी ‘पॅडमॅन’ हा चित्रपट याच मुद्द्यावर आधारित आहे. ज्यामध्ये मासिक पाळीदरम्यान महिलांना उद्भवणाºया समस्यांवर भाष्य केले जाईल. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सध्या सोशल मीडियावर सॅनेटरी नॅपकिनसोबत सेल्फी शेअर करण्याचे चॅलेंज केले जात आहे.