बी-ग्रेड चित्रपटातून करियरची सुरूवात करणारी ही अभिनेत्री आता बनली निर्माती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 16:56 IST2019-09-18T16:52:42+5:302019-09-18T16:56:05+5:30
आता ही अभिनेत्री आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी.

बी-ग्रेड चित्रपटातून करियरची सुरूवात करणारी ही अभिनेत्री आता बनली निर्माती
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे जीवन संघर्षमय होते. जेव्हा संजय त्याच्या जीवनातील सर्वात कठीण काळातून जात होता. त्यावेळी त्याला मान्यता दत्त भेटली. संजय दत्तच्या कुटुंबातील लोकांसोबत बऱ्याच लोकांना त्याचं मान्यता सोबतच्या नात्यामुळे खूश नव्हते. मात्र एकमेकांवरील प्रेम व विश्वासाच्या जोरावर बॉलिवूडमधील मोस्ट लविंग कपल्स म्हणून ते ओळखले जातात.
मान्यता दत्त खासगी आयुष्यासोबत प्रोफेशनल लाईफबाबत नवीन सुरूवात करते आहे.ती निर्माती म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे.
संजय दत्तचा नवा चित्रपट प्रस्थानम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून मान्यता संजय दत्त प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत निर्माती म्हणून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झालेला तेलगू चित्रपट प्रस्थानमचा हिंदी रिमेक आहे. हा एक पॉलिटिकल ड्रामा आहे.या चित्रपटात संजय दत्त, जॅकी श्रॉफ, मनीषा कोईराला, चंकी पांडे, अली फजल व सत्यजीत दुबे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मान्यचा दत्तने फिल्मी करियरची सुरूवात बी ग्रेड चित्रपटातून केली होती. याशिवाय ती २००८ साली कॉमेडी चित्रपट मेरे बाप पहले आपमध्ये दिसली होती. त्याशिवाय ती अभिनेता निमित वैष्णवसोबत लवर्स लाइक यासारख्या सिनेमात झळकली आहे.
मान्यतासोबत लग्न केल्यानंतर संजय दत्तने या चित्रपटाचे राइट्स वीस लाख रुपये देऊन विकत घेतले होते.