५ वर्षे तुरूंगात राहिल्यानंतर संजूबाबाची झाली होती अशी अवस्था, पत्नी मान्यताने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 06:37 PM2019-09-10T18:37:43+5:302019-09-10T18:38:17+5:30
संजय दत्तसाठी सर्वात कठीण काळ होता १९९३ सालचं. त्यावेळी त्याला पोलिसांनी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात टाडा कलमानुसार अटक केली होती.
संजय दत्तला बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली तितकेच त्याचं जीवन वादग्रस्त ठरलं होतं. अफेयर पासून ड्रग्जचे व्यसन या सगळ्या गोष्टींशी संजय दत्तचे नाव जोडलं गेलं होतं. संजय दत्तसाठी सर्वात कठीण काळ होता १९९३ सालचं. त्यावेळी त्याला पोलिसांनी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात टाडा कलमानुसार अटक केली होती. नंतर संजय दत्तला टाडा कलमातून मुक्त केलं होतं आणि आर्म्स अॅक्टनुसार त्याला पाच वर्षे तुरूंगवाल भोगावा लागला होता. या कठीण समयी संजय दत्तचं कुटुंब त्याच्यासोबत होतं. विशेष करून त्याची पत्नी मान्यता दत्त. मान्यता दत्तने नुकतंच एका मुलाखतीत या सर्व गोष्टींमुळे संजय दत्तची अवस्था कशी झाली होती.
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. मान्यताने सांगितलं की, ते आधीपासून या गोष्टीमुळे त्रस्त होते की कोर्टाने टाडातून मुक्त केलं हे पाहण्यासाठी वडील जिवंत नव्हते. या आरोपांमुळे त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा खराब झाली होती आणि त्यांचे वडील खूप चिंतेत होते.
यावर संजय दत्तने सांगितलं की, आता काळ्या ढगांचे सावट दूर गेलं असून आता मी सुकूनमध्ये आहे. ऋषी कपूर सरांसारखा चित्रपटाच्या सेटवर सर्वात खूश मी असतो. मला जे काम करायचं आहे ते मी करू शकतो.
आर्म्स अॅक्टअंतर्गत पाच वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त २५ फेब्रुवारी, २०१६ रोजी बाहेर आला. त्यावेळी संजय दत्तने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, २३ वर्षे ज्या आझादीसाठी तरसलो होतो ती ही आझादी आहे. माझी सगळ्यांना छोटीशी विनंती आहे की मी दहशतवादी नाही, देशभक्त आहे. टाडा कोर्टातून निर्दोष होऊन बाहेर पडलो होतो. आर्म्स अॅक्ट अंतर्गत मला दोषी ठरवण्यात आलं होतं.
संजय दत्तच्या जीवनावर संजू हा बायोपिकदेखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका केली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
आता संजय दत्त लवकरच प्रस्थानम चित्रपटात झळकणार आहे.