Gandhi Godse Ek Yudh: “ट्रोल करण्यासाठी बुद्धीची गरज नाही”; चिन्मय मांडलेकरने केली टीकाकारांची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 11:27 AM2023-01-12T11:27:55+5:302023-01-12T11:29:03+5:30

Gandhi Godse Ek Yudh: ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटावरून चिन्मय मांडलेकरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

marathi actor chinmay mandlekar replied troll and criticism over gandhi godse ek yudh cinema | Gandhi Godse Ek Yudh: “ट्रोल करण्यासाठी बुद्धीची गरज नाही”; चिन्मय मांडलेकरने केली टीकाकारांची बोलती बंद

Gandhi Godse Ek Yudh: “ट्रोल करण्यासाठी बुद्धीची गरज नाही”; चिन्मय मांडलेकरने केली टीकाकारांची बोलती बंद

googlenewsNext

Gandhi Godse Ek Yudh: गेल्या काही महिन्यांपासून अनेक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडले, अनेक चित्रपटांना नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले, तर काही चित्रपटांसाठी बॉयकॉट ट्रेंडही चालवण्यात आले. आताच्या घडीला पठाण चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता गांधी-गोडसे एक युद्ध चित्रपटावरून दावे-प्रतिदावे होताना दिसत आहे. या चित्रपटात मराठी अभिनेताचिन्मय मांडलेकरने या चित्रपटात नथुराम गोडसे भूमिका साकारली आहे. यावरून चिन्मय मांडलेकरवर टीका करण्यात येत आहे. याला चिन्मय मांडलेकरने प्रत्युत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

गांधी गोडसे-एक युद्ध चित्रपटाची घोषणा होताच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सर्वांसमोर आले. चित्रपटात नथुराम गोडसे भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर करत असल्याचे स्पष्ट झाले. चिन्मयचे नाव समोर येताच अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोल आणि टीकाकारांना चिन्मय मांडलेकरने उत्तर दिले आहे.

टीका आणि ट्रोल करण्यासाठी बुद्धीची गरज नाही

टीका आणि ट्रोल करण्यासाठी बुद्धीची गरज नाही. एक कलाकार म्हणून निर्माता म्हणून आपण आपले काम केले पाहिजे. हा चित्रपट माझ्याकडे आला तेव्हा मला या चित्रपटात एकच गोष्ट दिसली. ती म्हणचे या चित्रपटाची कथा. जर चित्रपटातील माहिती सर्वांना मिळणे गरजेचे आहे तर तुम्ही चित्रपटात नायकाची किंवा खलनायकाची भूमिका साकारता याने काही फरक पडत नाही. तुम्ही हिरो आहात, व्हिलन आहात, या गोष्टी माझ्यासाठी अजिबात महत्त्वाच्या नाहीत. होय, हे खरे आहे की, नथुराम गोडसे हे पात्र तुम्ही साकारले तर अपोआप वादांमध्ये अडकणार. कारण हे एक वादग्रस्त पात्र आहे. मात्र मी माझ्यावर होणाऱ्या टीकेवर विचार करत बसू शकत नाही. माझे काम अभिनय करणे आहे. वाद घालणे हे माझे काम नाही, या शब्दांत चिन्मय मांडलेकरने ट्रोल करणाऱ्यांना आणि टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. 

दरम्यान, दमदार चित्रपटांनी बॉलिवूड गाजवणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल नऊ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला संगीत ए. आर. रहमान यांचे आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: marathi actor chinmay mandlekar replied troll and criticism over gandhi godse ek yudh cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.