'नाईट शिफ्टमुळे लेकाला भेटता येत नव्हतं', शाहरुख म्हणाला, "सेम टू सेम"; गिरीजाने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 10:42 AM2023-09-14T10:42:02+5:302023-09-14T10:43:51+5:30

शाहरुखच्या सिनेमात काम करण्याचा एकंदर अनुभव कसा होता याचे अनेक किस्से तिने सांगितले.

marathi actress girija oak described her bond with shahrukh khan while shooting jawan | 'नाईट शिफ्टमुळे लेकाला भेटता येत नव्हतं', शाहरुख म्हणाला, "सेम टू सेम"; गिरीजाने सांगितला किस्सा

'नाईट शिफ्टमुळे लेकाला भेटता येत नव्हतं', शाहरुख म्हणाला, "सेम टू सेम"; गिरीजाने सांगितला किस्सा

googlenewsNext

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) नुकतीच शाहरुखसोबत (Shahrukh Khan) 'जवान' (Jawan)सिनेमात झळकली. 'जवान'मधील गर्ल गँगमध्येच गिरीजाही एक होती. गिरीजाने सिनेमात जबरदस्त अॅक्शनही केली आहे. शाहरुखच्या सिनेमात काम करण्याचा एकंदर अनुभव कसा होता याचे अनेक किस्से तिने सांगितले. यावेळी शाहरुख आणि तिचं कसं सारखंच दु:ख होतं याचंही एक उदाहरण तिने दिलं.

बॉलिवूडच्या किंग खानसोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं यापेक्षा चांगली संधी ती काय. मराठमोळ्या गिरीजा ओकला ती संधी मिळाली आणि तिनेही संधीचं सोनं केलं. गिरीजा एके मुलाखतीत म्हणाली,'शूटिंगवेळी आमची नाईट शिफ्ट सुरु होती. मी सहअभिनेत्री प्रियमणिसोबत बोलत होते. तिला म्हणलं नाईट शिफ्टमुळे मला मुलगा कबीरला भेटताच येत नाहीए. कारण मी शूटला येताना कबीर फुटबॉल खेळून घरी आलेला नसायचा आणि मी सकाळी आल्यावर तो झोपलेला असायचा. एकाच घरात राहूनही आम्ही भेटत नव्हतो.'

ती पुढे म्हणाली, 'माझं हे सगळं बोलणं बाजूलाच बसलेला शाहरुख ऐकत होता. तेवढ्यात तो म्हणाला सेम टू सेम. मलाही अबरामला भेटता येत नाही. (हाहा) हेच माझं शाहरुखसोबत असलेलं बाँडिंग होतं. नंतर माझा मुलगा सेटवर आला होता आणि शाहरुखचाही मुलगा सेटवर आला.'

'जवान' सिनेमात शाहरुखसोबत गर्ल गँग दाखवली आहे. या गर्ल गँगसोबत मिळून शाहरुख आपले मिशन पूर्ण करत असतो. 'जवान' सिनेमा सध्या खूपच गाजतोय. चाहत्यांना सिनेमा भलताच आवडला आहे. काही दिवसात सिनेमाने 300 कोटी पार केले आहेत.

Web Title: marathi actress girija oak described her bond with shahrukh khan while shooting jawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.