Prajakta Mali: प्राजक्ता माळीनं पुण्यात कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 02:50 PM2022-10-25T14:50:41+5:302022-10-25T14:52:58+5:30

Prajakta Mali celebrated Diwali : प्राजक्ताने लक्ष्मीपुजनाचे फोटो शेअर केले आहेत. नेहमीप्रमाणे प्राजक्ताच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

marathi actress Prajakta Mali celebrated Diwali with family in Pune, shared photos | Prajakta Mali: प्राजक्ता माळीनं पुण्यात कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी, शेअर केले फोटो

Prajakta Mali: प्राजक्ता माळीनं पुण्यात कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी, शेअर केले फोटो

googlenewsNext

प्राजक्ता माळी (Prajakta Mali )सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज नवे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. प्राजक्ताने एखादी पोस्ट केली रे केली की, ती लगेच व्हायरल होते. कालपरवा प्राजू मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी झाली होती. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानचे तिचे फोटोही व्हायरल झाले होते. यातील एका फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.  राज ठाकरे यांच्या नातवाला प्राजक्ता खेळवतानाही दिसली होती. आता काय, तर प्राजक्ताने कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत. होय, प्राजक्ताने कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

प्राजक्ता मुंबईत राहते. पण दिवाळीसाठी ती खास आपल्या पुण्यातील घरी पोहोचली. यावेळी कुटुंबासोबत तिने उत्साहात दिवाळी साजरी केली. लक्ष्मीपुजनाचे फोटो तिने शेअर केले. नेहमीप्रमाणे प्राजक्ताच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. तसेच तिला दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

प्राजक्ता माळी सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो होस्ट करताना दिसते. अनेकदा शोमधील कलाकार प्राजक्ताची सेटवर फिरकी घेताना दिसतात. सोशल मीडियावरही प्राजक्तावरचे मीम्स व्हायरल होताना दिसतात. प्राजक्ता स्वत:वरचे हे सगळे विनोद खिलाडूवृत्तीनं स्वीकारते. प्रत्येकाला खळखळून हसत दाद देते.   प्राजक्ताने नुकतेच एका आगामी मराठी चित्रपटाचं शूटिंग केले आहे. त्यासाठी ती लंडनला गेली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

Web Title: marathi actress Prajakta Mali celebrated Diwali with family in Pune, shared photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.