५ हजार चपला, ८ हजार ड्रेस ठेवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा झाला दुर्देवी अंत, शेवटच्या दिवसात भिक मागून केला उदरनिर्वाह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 06:00 AM2023-04-28T06:00:00+5:302023-04-28T06:00:00+5:30

मराठमोळी ही अभिनेत्री आयुष्यभर ऐषोरामात जगली, पण शेवटच्या दिवसांत तिला भिक मागून रहावं लागलं. भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर फेकलेल्या कुजलेल्या भाज्या घरी आणून ती शिजवून खात होती.

Marathi actress who kept 5000 shoes, 8000 dresses met a sad end, she had to pick food from the street and eat it | ५ हजार चपला, ८ हजार ड्रेस ठेवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा झाला दुर्देवी अंत, शेवटच्या दिवसात भिक मागून केला उदरनिर्वाह

५ हजार चपला, ८ हजार ड्रेस ठेवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा झाला दुर्देवी अंत, शेवटच्या दिवसात भिक मागून केला उदरनिर्वाह

googlenewsNext

बॉलिवूडची 'टॉप मोस्ट डान्सर' जिच्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले आणि ओळखले असेल पण ती पडद्यावर आली जेव्हा लोकांना डान्सबद्दल फारशी माहिती नव्हती आणि या अभिनेत्रीने लहानपणापासूनच सर्वोत्कृष्ट डान्सर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. ही गोष्ट १९५०च्या दशकातील आहे, जेव्हा मुलींना नृत्य आणि संगीतापासून दूर ठेवले जात होते आणि याच काळात बॉलिवूडची पहिली 'आयटम गर्ल' कुक्कू मोरेने 'डान्स आयटम' नंबरची सुरुवात केली होती. त्या काळात ती फक्त तगडं मानधनच आकारलं नव्हतं तर तिने आपल्या सिनेमा प्रेमींना भुरळ पाडली होती. 

पन्नासच्या दशकात कुक्कूच्या कॅबरे डान्सची क्रेझ इतकी होती की त्याकाळी ती एका डान्ससाठी ६००० रुपये घेत होती. निर्माते खुशीत तिला एवढी मोठी रक्कम द्यायला तयार होते, जी त्यावेळी खूप जास्त असायची. कुक्कूने १९४६ मध्ये 'अरब का सितारा' या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिने इतका चांगला डान्स केला की दिग्दर्शकांनी तिला प्रत्येक चित्रपटात साईन करायला सुरुवात केली. तिची डान्सिंग टॅलेंट आणि अप्रतिम कॅबरे स्टाइल पाहून लोक तिला 'रबर गर्ल' म्हणू लागले. यानंतर त्यांनी 'अनोखी अदा', 'अंदाज' 'शायर', 'बरसात', 'पतंगा' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. जवळपास प्रत्येक इतर चित्रपटात, कुक्कू मोरे एक नृत्यांगना म्हणून दिसली आणि तिच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करत होती.

हेलन आणि कुक्कू होते फॅमिली फ्रेंड
कुक्कूने हेलनला चित्रपटात आणले. कुक्कू मोरेने बॉलिवूडमध्ये अनेक चेहरे लाँच केले, त्यापैकी एक अभिनेता होता प्राण आणि दुसरी होती हेलन. १९५१ मध्ये कुक्कूने हेलनची ओळख करून दिली. त्यावेळी हेलन फक्त १३ वर्षांची होती. हेलनची कुक्कू मोरेसोबतची पहिली भेट कशी होती याबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले. 'सिनेस्तान'च्या वृत्तानुसार, हेलन म्हणाली होती, 'मी जेव्हा शाळेत जात असताना मी कुक्कूला भेटले होते, तिला भेटण्यापूर्वी मी बोर्डिंग स्कूलमध्ये होते. मम्मीची तिच्याशी मैत्री झाली आणि तशी आमची भेट झाली. आमच्या बोर्डिंग स्कूलच्या दिवसांत कुक्कू मोरेच्या कुटुंबाशी आमची मैत्री झाली. मी तिच्यासोबत स्टुडिओत जाऊ लागले. कसं माहीत नाही, पण माझ्या आईलाही वाटले की मी चित्रपटात प्रवेश करावा. त्यावेळी मी खूप लहान होते, बहुधा १२-१३ वर्षांची होती. तिच मला या क्षेत्रात घेऊन आली.

ऐषोरामात जगली पण...
लेन आणि कुक्कू मोरे यांनी बिमल रॉय यांच्या 'याहुदी' आणि 'हिरा मोती' या चित्रपटात एकत्र नृत्यही केले होते आणि त्यानंतर १९६३ मध्ये आल्यावर कुक्कू मोरे यांनी चित्रपटांमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण पाहिले. त्यांच्या कमाईतून कुक्कू मोरेने मुंबईत मोठा आलिशान बंगला घेतला होता. त्या काळात कुक्कू मोरेंकडे तीन आलिशान वाहने होती. यातील एक वाहन फक्त त्याच्या कुत्र्यासाठी, तर एक तिच्यासाठी आणि दुसरे मित्रांसाठी. कुक्कू मोरेकडे त्यावेळी अनेक फ्लॅट्स आणि भरपूर दागिने होते. तिच्याकडे भरपूर दागिने असूनही वेगवेगळ्या डिझाईन्सच्या ५ हजार चप्पल आणि ८ हजारांहून अधिक महागडे डिझायनर ड्रेस होते, असेही सांगितले जाते.

रस्त्यावरचं उचलून खावं लागलेलं अन्न

अभिनेत्री तबस्सुम तिच्या 'तबस्सुम टॉकीज' या शोमध्ये कुक्कू मोरेबद्दल म्हणाली, 'ती नेहमी म्हणायची की माझ्या अवस्थेला मीच जबाबदार आहे, जेव्हा माझ्याकडे खूप पैसे होते तेव्हा मी त्याचे कौतुक केले नाही. पाण्यासारखे वाहत होते. परिणामी, नंतर ती एक-एक रुपयासाठी तरसू लागली. शेवटच्या दिवसात कुक्कू मोरेला कॅन्सर झाला आणि ती खूप आजारी पडू लागली आणि परिस्थितीशी झुंज देत कुक्कू मोरे स्वतःहून तिची कामे करत असे. भाजी विक्रेते साफ करून देठ आणि कचरा रस्त्यावर फेकायचे ते गोळा करून ती घरी आणायची. ती फक्त शिजवून खात असे. परिस्थिती अशी होती की ना अन्नासाठी पैसे होते ना कफन विकत घेण्यासाठी पैसे शिल्लक होते. अखेरीस, ३० सप्टेंबर, १९८१ रोजी, कुक्कू मोरे कॅन्सर आणि मृत्यूशी झुंज दिली. असे म्हटले जाते की कुक्कू मोरेच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील कोणीही शोक व्यक्त करण्यासाठी किंवा तिचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचले नव्हते.

Web Title: Marathi actress who kept 5000 shoes, 8000 dresses met a sad end, she had to pick food from the street and eat it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.