'पंचायत' फेम जितेंद्र कुमारसोबत 'ड्राय डे' सिनेमात झळकणार मराठमोळी ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 12:21 PM2023-12-12T12:21:24+5:302023-12-12T12:21:52+5:30

Jitendra Kumar : 'पंचायत' वेबसीरिजमधून लोकप्रिय झालेला जितेंद्र कुमार लवकरच ड्राय डे सिनेमात झळकणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

Marathi Actress will appear in the movie 'Dry Day' with Jitendra Kumar of 'Panchayat' fame. | 'पंचायत' फेम जितेंद्र कुमारसोबत 'ड्राय डे' सिनेमात झळकणार मराठमोळी ही अभिनेत्री

'पंचायत' फेम जितेंद्र कुमारसोबत 'ड्राय डे' सिनेमात झळकणार मराठमोळी ही अभिनेत्री

'पंचायत' वेबसीरिजमधून लोकप्रिय झालेला जितेंद्र कुमार लवकरच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या ड्राय डे सिनेमात झळकणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. यात त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकर झळकणार आहे.  तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतील डब आवृत्तींसह 22 डिसेंबर रोजी प्राईम व्हीडिओवर ड्राय डेचा प्रीमियर होईल. 

ड्राय डे या सिनेमाचे कथानक देशाचे हृदय मानल्या जाणाऱ्या राज्यातील एका गावात फुलते, विनोद-नाट्यमय कथेत काही काळ गुंडगिरीत असणाऱ्या गन्नू या प्रमुख पात्राचा यंत्रणेविरुद्धचा प्रवास उलगडत जातो. हे पात्र अभिनेता जितेंद्र कुमार याने साकारले आहे. आपल्या जिवलगांचा विश्वास आणि प्रेम संपादित करण्याच्या भावनिक शोधात गन्नूला बाह्य आव्हाने झेलावी लागतात, शिवाय त्यांच्या स्वत:च्या असुरक्षितता आणि दारूच्या व्यसनाशी संघर्ष असतो.  सौरभ शुक्ला (Saurabh Shukla) दिग्दर्शित आणि मोनिषा अडवाणी (Monisha Advani), मधू भोजवानी (Madhu Bhojwani), निखिल अडवाणी (Nikkhil Advani) निर्मित या सिनेमात जितेंद्र कुमार (Jitendra Kumar), श्रीया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) आणि अन्नू कपूर (Annu Kapoor) मुख्य भूमिकेत झळकतील.    


इमे एंटरटेनमेंटचे निर्माता निखिल अडवाणी यांनी सांगितले की, हा सिनेमा सामाजिक व्यंगावर खेळकर अंगाने करुणा-विनोदी पद्धतीने भरपूर भावभावना-नाट्याचे दर्शन घडविणार आहे. ड्राय डे दारूच्या व्यसनावर महत्त्वपूर्ण आणि समर्पक संदेश देतो. अशास्वरुपाचा सिनेमा मला करायला मिळाला हे माझे भाग्य आहे. मुंबई डायरीज ‘च्या तुफान यशानंतर दरम्यानच्या काळात प्राईम व्हीडीओसोबतचे आमचे संबंध अधिक सशक्त होत आहेत. या अर्थवाही कलाकृतीला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल.

Web Title: Marathi Actress will appear in the movie 'Dry Day' with Jitendra Kumar of 'Panchayat' fame.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.