नागराज मंजुळेंनी पहिल्यांदाच सांगितला हिंदी कलाविश्वात काम करण्याचा अनुभव; म्हणाले...
By शर्वरी जोशी | Published: February 22, 2022 06:50 PM2022-02-22T18:50:00+5:302022-02-22T18:50:00+5:30
Nagraj manjule:मराठीमध्ये अनेक चित्रपट केल्यानंतर नागराज मंजुळे पहिल्यांदाच एका हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपट अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
'सैराट', 'नाळ', 'पिस्तुल्या' अशा एकाहून एक सरस चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले दिग्दर्शक, अभिनेता म्हणजे नागराज मंजुळे. आजवर नागराज मंजुळे यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून समाजाला एक संदेश पोहोचवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मराठी कलाविश्वात नशीब आजमावल्यानंतर आता त्यांनी त्यांचा मोर्चा बॉलिवूड चित्रपटांकडे वळवला आहे. त्यामुळे लवकरच त्यांचा 'झुंड' हा पहिलावहिला बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी 'लोकमत'ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी बॉलिवूड आणि मराठी कलाविश्वात काम करताना कोणता फरक जाणवतो याविषयी भाष्य केलं.
मराठीमध्ये अनेक चित्रपट केल्यानंतर नागराज मंजुळे पहिल्यांदाच एका हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपट अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. त्यामुळे या चित्रपटात काम करण्याचा आणि पहिल्याच हिंदी सिनेमाचा अनुभव कसा होता हे त्यांनी सांगितलं.
Exclusive:...म्हणून चित्रपटांसाठी नागराज मंजुळे करतात नॉन ग्लॅमरस चेहऱ्यांची निवड
"आमची संपूर्ण टीम म्हणजे आमचा सगळा परिवार फार मिळून-मिसळून आम्ही काम करत होतो. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या सेटवर असलेला गोंधळ, मज्जा-मस्ती सारं काही होतं. अमिताभ बच्चन सुद्धा सगळ्यात समरसून गेले. त्यामुळे वेगळेपण जाणवलं नाही. माध्यम तेच असतं. फक्त भाषा बदलली पण त्यामुळे वेगळेपण काही जाणवलं नाही", असं नागराज मंजुळे म्हणाले.
एकेकाळी बिग बींचा चित्रपट पाहण्यासाठी नागराज मंजुळेंनी गोळा केले होते पैसे
दरम्यान, झुंड या चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. येत्या ४ मार्च हा चित्रपट प्रदर्शित होत असून यात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे.