‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ पाहून संजय जाधव भारावले, म्हणाले, “करण जोहर तुमच्याकडून...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 10:43 AM2023-07-31T10:43:20+5:302023-07-31T10:44:31+5:30

संजय जाधव यांना करण जोहरचं कौतुक, रॉकी और रानी की प्रेम कहानी पाहिल्यानंतर शेअर केली खास पोस्ट

marathi director sanjay jadhav praises karan johar after watched rocky aur rani ki prem kahani movie | ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ पाहून संजय जाधव भारावले, म्हणाले, “करण जोहर तुमच्याकडून...”

‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ पाहून संजय जाधव भारावले, म्हणाले, “करण जोहर तुमच्याकडून...”

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. २८ जुलैला प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल नऊ वर्षांनी करण जोहरने दिग्दर्शनात कमबॅक केलं आहे. मराठमोळे दिग्दर्शक संजय जाधव यांनीही करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपट पाहिला.

करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ पाहून संजय जाधव भारावून गेले आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’चं पोस्टर संजय जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केलं आहे. “करण जोहर सर तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. खूपच मनोरंजक चित्रपट”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ११.१० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १६ कोटींची कमाई केली. तर रविवारी रणवीर-आलियाच्या चित्रपटाने १८ कोटी कमवले. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने तब्बल ४५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात रणवीर-आलियासह धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमीबरोबरच मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगही मुख्य भूमिकेत आहे.

Web Title: marathi director sanjay jadhav praises karan johar after watched rocky aur rani ki prem kahani movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.