विनोद मेहरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ,वाचा Bindiya Goswami च्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 04:36 PM2022-01-06T16:36:30+5:302022-01-06T16:40:42+5:30

दिग्दर्शक जेपी दत्ता (JP Dutta) आणि बिंदिया (Bindiya Goswami) यांची पहिली भेट 1976 मध्ये सरहद चित्रपटाच्या सेटवर झाली होती.विनोद मेहरा यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर बिंदियाने 1985 मध्ये जयपूरमध्ये जेपी दत्ता यांच्याशी पुनर्विवाह केला.

Marriage to famous director after divorce with Vinod Mehra, read Bindiya Goswami's Unknown Fact | विनोद मेहरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ,वाचा Bindiya Goswami च्या खास गोष्टी

विनोद मेहरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ,वाचा Bindiya Goswami च्या खास गोष्टी

googlenewsNext

'गोलमाल' (1979) चित्रपटात काम केलेली अभिनेत्री बिंदिया गोस्वामी (Bindiya Goswami) 65 वर्षांची झाली आहे. 6 जानेवारी 1957 रोजी राजस्थानमध्ये जन्मलेल्या बिंदियाने 1976 मध्ये आलेल्या 'जीवन ज्योती' या सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. मात्र, गोलमालमध्ये साकारलेल्या उर्मीच्या भूमिकेतून तिला ओळख मिळाली. बिंदियाने तिच्या करिअरच्या मध्यावर वयाच्या २३ व्या वर्षी अभिनेता विनोद मेहरासोबत(Vinod Mehra) लग्न केले. विनोद मेहरासोबतचे तिचे लग्न फार काळ टिकले नाही आणि 4 वर्षांनी 1984 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.


विनोद मेहरापासून वेगळे झाल्यानंतर बिंदिया गोस्वामीने प्रसिद्ध दिग्दर्शक जेपी दत्ता (JP Dutta)  यांच्याशी दुसरे लग्न केले. जेपी दत्ता बिंदियापेक्षा 12 वर्षांनी मोठे आहेत. बॉर्डर, गुलामी, यतिम, बंटवारा आणि एलओसी कारगिल सारखे चित्रपट दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक जेपी दत्ता आणि बिंदिया यांची पहिली भेट 1976 मध्ये सरहद चित्रपटाच्या सेटवर झाली होती.विनोद मेहरा यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर बिंदियाने 1985 मध्ये जयपूरमध्ये जेपी दत्ता यांच्याशी पुनर्विवाह केला. जेपी दत्ता वयाने बिंदियापेक्षा खूप मोठे होते. त्यामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. 

पण 1985 मध्ये दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर काही काळातच बिंदियाने अभिनय सोडला आणि आपल्या संसारात व्यस्त झाली. लग्नानंतर बिंदिया चित्रपटांमध्ये काम करण्यापासून दूर राहिली असेल, बिंदिया रुपेरी पडद्यावर झळकत नसली तरी तिने खूप काम केले. चित्रपटा हिस्सा बनून ती राहिली. बॉर्डर, रिफ्युजी, एलओसी कारगिल, उमराव जान यांसारख्या चित्रपटांमध्ये बिंदिया गोस्वामीने महिला स्टार्सचे पोशाख डिझाइन केले आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. बिंदिया गोस्वामी आणि जेपी दत्ता यांना निधी आणि सिद्धी या दोन मुली आहेत. निधीचा विवाह यावर्षी 7 मार्च रोजी दिग्दर्शक बिनॉय गांधी यांच्यासोबत जयपूरमध्ये झाला होता.

जेपी दत्ता यांनी जयपूरमध्येच बिंदिया गोस्वामीला प्रपोज केले होते. ज्या ठिकाणी जेपीने लग्न केले होते आणि ज्या झाडाखाली निधीनेही बिनॉयसोबत सात फेरे घेत लग्न केले. बिंदिया गोस्वामीने एका मुलाखतीत पती जेपी दत्ताबद्दल सांगितले होते की, ते एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. बिंदियाच्या म्हणण्यानुसार, जेपी फार कमी बोलतात आणि मी सतत बोलत राहते. 

इतकंच नाही तर नवऱ्याच्या रोमान्सबद्दल बिंदिया म्हणाली होती की, ते अजिबात रोमँटिक नाही,  मला बाहेर फिरायला, एक्सप्लोर करायला फार आवडतं. याउलच जेपींना घरी बसणे आवडते.बिंदिया गोस्वामी शेवटची 1987 मध्ये आलेल्या 'मेरा यार मेरा दुश्मन' या चित्रपटात दिसली होती. तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यात चोर पुलिस, मेहंदी, रेशमा, आमने सामने, सन्नाटा, बंदिश, शान, दादा, जानदार, गोलमाल, मुकाबला, प्रेम विवाह, कॉलेज गर्ल, खट्टा मीठा, राम कसम, जय विजय, मुक्ति, कर्म, जीवन ज्योति यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

Web Title: Marriage to famous director after divorce with Vinod Mehra, read Bindiya Goswami's Unknown Fact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.