MC Stan Birthday : एमसी स्टॅनच्या आलिशान गाडीची किंमत माहितेय का? ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 01:02 PM2024-08-30T13:02:18+5:302024-08-30T13:03:41+5:30

'बस्ती की हस्ती' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमसी स्टॅनचा आज वाढदिवस आहे.

MC Stan Birthday Bigg Boss 16 winner luxurious car worth Rs 1.5 crore | MC Stan Birthday : एमसी स्टॅनच्या आलिशान गाडीची किंमत माहितेय का? ऐकून व्हाल थक्क

MC Stan Birthday : एमसी स्टॅनच्या आलिशान गाडीची किंमत माहितेय का? ऐकून व्हाल थक्क

लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन सतत चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. 'बस्ती की हस्ती' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमसी स्टॅनचा आज २५ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह अनेक मित्रमंडळी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. एमसी स्टॅन हा त्याच्या आलिशान लाईफस्टाईलमुळे देखील कायम चर्चेत असतो. तुम्ही एमसी स्टॅनचे चाहते असाल तर तुम्हाला त्याच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल.

एमसी स्टॅनला लग्झरी गाड्यांची खूप आवड आहे.  काही दिवसांपुर्वीच  एमसी स्टॅनने एक आलिशान गाडी खरेदी केली होती. त्या गाडीची किंमत ऐकूण तुम्हालाही वेड लागेल. एमसी स्टॅनने आपल्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी नवी कोरी डिफेंडर 110 खरेदी केली होती. जिची किंमत ही तब्बल 1.5 कोटी आहे. ही गाडी एमसी स्टॅनच्या बोल्ड आणि डायनॅमिक व्यक्तिमत्त्वाला साजेशी आहे. ही फक्त एक आलिशान गाडी नाही तर पुण्याच्या रस्त्यांवरुन प्रसिद्ध रॅपर बनण्यापर्यंतच्या एमसी स्टॅनच्या प्रवासाचं एक प्रतिबिंब आहे.लँड रोव्हरची ही नवीन कार कंपनीने आधुनिक पद्धतीने तयार केली आहे. ही एक पॉवरफुल आणि वेगवान कार आहे. 


एमसी स्टॅनचा जन्म 30 ऑगस्ट 1999 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. त्याला संपुर्ण जग हे एमसी स्टॅन म्हणून ओळखत असले तरी त्याचं खरे नाव हे वेगळेच आहे. एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे. तो एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबातील आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की त्याला लहान वयातच शिक्षण सोडावे लागलं होतं. लहानपणी प्रत्येक पैशासाठी तळमळणारा एमसी स्टॅन आज करोडोंचा मालक आहे. 


Web Title: MC Stan Birthday Bigg Boss 16 winner luxurious car worth Rs 1.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.